Youth drowning case : तलावात बुडून दोन तरुण मित्रांचा मृत्यू

फुलंब्री ः मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले
youth drowning case
फुलंबी : घटनास्थळी दाखल झालेले पोलिस कर्मचारी. pudhari photo
Published on
Updated on

फुलंबी : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यावरील तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.शेख रहीम शेख अहमद (18, रा. बायजीपुरा ) व इमान शेख इरफान शेख (17, रा. नायगाव ) हे दोघे मित्र गुरुवारी (दि.5) नायगाव तलावात पोहण्यासाठी आले होते. चप्पल, बूट व मोबाईल तलाव काठावर ठेवून ते पाण्यात उतरले. काही कळण्यापूर्वीच पाण्याचा अंदाज न आल्याने बूडून त्यांचा मृत्यू झाला.

ते घरी न आल्याने घरच्यांनी व मित्रांनी त्यांच्याशी रात्रभर अनेकदा मोबाईलवर कॉल केला. रिंग जात होती, परंतु समोरून उत्तर मिळत नसल्याने घरच्यांची चिंता वाढली. शोध घेतला असता तलावाच्या काठावर बूट, चप्पल, मोबाईल आढळून आले. संशय आल्याने फुलंबी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी (दि.6) सकाळी 9 च्या दरम्यान पोलिस तलाव काठावर पोहोचले.

youth drowning case
Chatrapati sambhajinagar Crime : खंडणीसाठी मजुराचे अपहरण

अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात दोघांचा शोध लागला. रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत केले.

पोलिस निरीक्षक संजय सहाने, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, उपनिरीक्षक सुग््राीव चाटे, जमादार पाचंगे, हवालदार कणसे, पुढील तपास करीत आहेत.

youth drowning case
Haribhau Bagde : रसायनमुक्त अन्नधान्यासाठी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news