

Grant scam; Seventh accused arrested from Beed
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या २४ कोटी ९० लाख ७७ हजार रुपयांच्या नैसर्गिक आपत्ती घोटाळ्यात पोलिसांनी सहा आरोपी जेरबंद केले होते. बुधवारी बीड येथून बाळू लिंबाजी सानप हा सातवा आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
अंबड व घनसावंगी तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने जीआर काढून शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील याद्यात अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करून मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल. काही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांची नावे शेतकरी याद्यांमध्ये टाकून शासनाची फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम काढून अपहार करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे.
अपात्र लोकांची नावे शेतकरी याद्यांमध्ये टाकून शासनाची फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम काढून अपहार करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून आले. यापूर्वी सहा आरोपी जेरबंद झाले आहेत. बाळू लिंबाजी सानप हा आरोपी सतत ठिकाण बदलून पोलिसांना चकवत होता.
आरोपी टप्प्यात
आपत्ती व्यवस्थापन घोटाळ्यातील इतर आरोपीही लवकरच पोलिसांच्या टप्प्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व आरोपी जेरबंद झाल्यानंतर या घोटाळ्याचे खरे सत्य समोर येण्याची शक्यता आहे.