Jalna News : ग्रामपंचायतींचा पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर, दै. पुढारीच्या वृत्ताची दखल

दै. पुढारीने ११ जून रोजी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा विसर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
Jalna News
Jalna News : ग्रामपंचायतींचा पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर, दै. पुढारीच्या वृत्ताची दखल File Photo
Published on
Updated on

Gram Panchayats used bleaching powder for clean water

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर खरेदी करून वापराने निर्देश आहे. तरी देखील भोकरदन तालुक्यात ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत होता. यामुळे दै. पुढारीने ११ जून रोजी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा विसर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर या वृत्ताची दखल घेत वाकडी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुध्द करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात आला.

Jalna News
Jalna Agriculture News : खरिपाचे पीक पावसाच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये शासनाची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. यातील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली कार्यान्वित आहेत.

मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील विहिरीमध्ये नवीन पाणी आले आहे. हे पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे. या पाण्यातून जंतू संसर्ग होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Jalna News
Jalna Accident : वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटपून परतत असताना अपघात; ट्रकखाली सापडून आजीसह नातू ठार

विहिरी व इतर पाण्याच्या स्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नसल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने ११ जून रोजी प्रसिद्ध केली होती, या अनुषंगाने वाकडी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून काही गावांतील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news