

Gondi police take action against underage bike riders
शहागड, पुढारी वृत्तसेवा: अबंड तालुक्यातील शहागड - गोंदी पोलिस ठाण्यांतर्गत सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी १२५ वाहनांची तपासणी करून पोलिसांनी १५ वाहनचालकांवर ३८ हजारांची दंडात्मक कारवाई केली.
गोंदी पोलिसांनी शहागड गावासह अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडीगोद्री येथील गुरुदेव विद्यामंदिर शाळा परिसरात नाकाबंदी करून १२५ वाहनांची तापासणी केली. त्यात १५ दुचाकी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा वाहने अल्पवयीन मुले चालवित असल्याचे आढळून आले. त्यांच्या पालकांना बोलावून पोलिसांनी समज देऊन नोटीस दिली.
या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आसून ३८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. येणार आहेत. या पुढेही ही मोहीम राबविण्यात अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलिस जमादार फुलचंद हजारे, रामदास केंद्रे, प्रदीप हवाळे, चालक सचिन साठे यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान गाढे, पराशे यांनी ही कारवाई केली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक अल्पवयीन मुले शाळा व महाविद्यालयांत दुचाकीवर येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अल्पवयीन मुलांना वाहतूक नियमांचे कोणतेही भान नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे.