

Gavathi pistol, two cartridges, sword recovered from Mondhya
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवीन मोंढा भागात चंदनझिरा पोलिसांनी पिस्टल व तलवार बाळ-गणाऱ्या दोन इसमांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत कारतुसे व एक तलवार जप्त करण्यात आली.
येथील चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह सहकारी पोलिसांनी अवैध धंदे, अवैध शस्त्र, बेशिस्त वाहतूक याविरुध्द कारवाया करण्यात येत आहे. २३ जून रोजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना खबऱ्याने माहिती दिली की नवीन मोढा भागामध्ये गेट क्र। वर एक इसम कमरेला गावठी पिस्टल बाळगून शरीराविरुध्द किंवा मालाविरुध्दचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या इर-ाद्याने फिरत आहे.
पोलिस निरीक्षक पवार यांनी माहितीच्या ठिकाणी जाऊन रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास छापा मारला असता नवीन मोंडा गेट क्र। मध्ये हॉटेल साईच्या समोर शहरातील व्दारकानगर भागातील नवीन मोंढा भागात प्रवीण बबनराव शिदे हा संशयितरीत्या फिरत असताना मिळून आला.
त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतुसे मिळून आले. त्यास गावठी पिस्टल कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता, त्याने पिस्टल व काडतुसे हे व्दारकानगर भागातील लखनसिग रामसिंग टाक यांच्याकडून खरेदी केली असल्याचे सांगितल्याने लखनसिंग याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक धारदार तलवार मिळून आल्याने जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी विरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक मारीयो स्कॉट व सचिन सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार चन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि सचिन सानप, पोउपनि मारीयो स्कॉट, प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, रेश्मा गुरुम यानी केली.
जालना शहरात अवैध गावठी पिस्तूल, काडतुसे व तलवारी मागील काही महिन्यांपासून पोलिसांकडून जप्त करण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्यावतीने पिस्तूल विक्री व खरेदीसाठी आलेल्या दोन जणांना यावेळी जेरबंद करण्यात आले. पिस्तूल पन्नास हजाराला तर काडतुस १४०० रुपयांना विक्री झाल्याचे समोर आले.