गौराईंचे घराघरांत पूजन; आज विसर्जन

मंगळवारी माहेरवासीण म्हणून आलेल्या गौराईंचे पूजन थाटात झाले. आज गौराईंचे विसर्जन होणार आहे.
Gaurai immersion
गौराईंचे घराघरांत पूजन; आज विसर्जन File Photo
Published on
Updated on

Gaurai is worshipped in every household; immersion today

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: गौराईंचे घरो घरी मंगळवारी सोनपावलांनी आगमन झाले. 'पायात पैंजण छुम, छुम करत गौराई आली सोन पावलांनी' असे म्हणत महिलांनी गौराईचे उत्साहात स्वागत केले. बुधवारी माहेरवासीण म्हणून आलेल्या गौराईंचे पूजन थाटात झाले. गुरुवारी गौराईंचे विसर्जन होणार आहे.

Gaurai immersion
Jalna News : ज्वारीचा पेरा पडला मागे : कॅश क्रॉपची चलती

घरोघरी गणेशाचे २७ ऑगस्ट रोजी आगमन झाल्यानंतर ३१ रोजी तीन दिवसांची पाहुणी माहेरवासीण म्हणून गौराईंचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारल्याचे चित्र आले. मंगळवारी सकाळ पासूनच गौराईंच्या स्वागताची लगबग झाल्यानंतर बुधवारी गौराई पूजन करण्यात आले.

गौरी बसवण्याच्या पद्धती सर्व घरांमध्ये वेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. विशेष बाब म्हणजे मंडप, लायटिंग व डेकोरेशनही यावेळी मोठ्या प्रमाणात केले जाते.

Gaurai immersion
Maratha Reservation : गणेश मंडळांचे मराठा आंदोलकांना अन्नसहाय्य

पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईकांना जेवण्यासाठी बोलावण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news