

Gates at 104 out of 255 Kolhapuri dams; 4 thousand 40 gates installed
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात एकूण २५५ कोल्हापुरी बंधारे असून त्यापैकी १०४ बंधाऱ्यांवर गेट बसविण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांवर एकूण ४ हजार ४० गेट टाकण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गतवर्षी २०२५ मध्ये गेट बसविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. गतवर्षी चांगला पाऊस झाला. मात्र, यंदा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आल आहे.
दरम्यान, तालुकानिहाय जाफराबाद आकडेवारीनुसार तालुक्यात ४२ को.प. बंधाऱ्यांपैकी २५ बंधाऱ्यांवर तब्बल १ हजार ७८३ गेट बसविण्यात आले आहेत. त्याखालोखाल भोकरदन तालुक्यात ६२ पैकी ४४ बंधाऱ्यांवर १ हजार ४२८ गेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गेट बसविण्याच्या संख्येत जाफराबाद व भोकरदन तालुके आघाडीवर आहेत.
जालना तालुक्यात ६४ को.प. बंधाऱ्यांपैकी ४ बंधाऱ्यांवर ३९६ गेट, तर अंबडमध्ये २६ पैकी १६ बंधाऱ्यांवर १९१ गेट बसविण्यात आले आहेत. बदनापूरमध्ये ३३ पैकी एका बंधाऱ्यावर ४५ गेट, परतूरमध्ये ९ पैकी ६ बंधाऱ्यांवर १८ गेट, मंठ्यात ५ पैकी ३ बंधाऱ्यांवर ९२ गेट आणि घनसावंगीत १४ पैकी ५ बंधाऱ्यांवर ८७ गेट टाकण्यात आले आहेत.
पावसाळ्यात उपलब्ध पाणी अडवून ते शेती व इतर उपयोगासाठी साठविण्याच्या दृष्टीने को.प. बंधाऱ्यांना महत्त्व आहे. त्यामुळे गेट बसविण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठे बळकट करण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची (को. प. बंधारे) दुरुस्ती व गेट टाकण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण २५५ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी १०४ बंधाऱ्यांमध्ये ४,०४० गेट्स यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत.
तालुकानिहाय पाहता, भोकरदन तालुक्यात ४४ बंधाऱ्यांत १,४२८ गेट्स, तर जाफ्राबाद तालुक्यात २५ बंधाऱ्यांत १,७८३ गेट्स टाकून पाणी अडवण्याचे काम करण्यात आले आहे. आगामी पावसात पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून भूजल पातळी वाढवणे आणि टंचाईची तीव्रता कमी करणे यावरच आता प्रशासकीय यंत्रणेचा पूर्ण भर असणार आहे.
डीपीडीसीचा सर्व निधी फक्त जलसंधारणावरच; इतर विकासकामे गोठवली !
दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जालना दौऱ्यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत, जिल्हा वार्षिक योजनेचा (DPDC) सर्व निधी केवळ जलसंधारणाच्या कामांवरच खर्च करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर सिमेंट रस्त्यांची कामे करता येणार नसून या बिगर-जलसंधारणाच्या कामांचा निधी गोठवण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठे बळकट करण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची (को. प. बंधारे) दुरुस्ती व गेट टाकण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.
भोकरदन अन् जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक काम
तालुकानिहाय आकडेवारीचा आढावा घेतला असता, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे सर्वाधिक काम झाल्याचे दिसून येते. भोकरदन तालुक्यातील ६२ बंधाऱ्यांपैकी ४४ बंधाऱ्यांमध्ये १,४२८ गेट्स बसवण्यात आले आहेत.
तर जाफराबाद तालुक्यातील ४२ पैकी २५ बंधाऱ्यांमध्ये तब्बल १,७८३ गेट्स टाकून पाणी अडवण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.