Jalna News : महावितरणच्या पोलवरील वीज तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

२० लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ गुन्हे उघड
Jalna News
Jalna News : महावितरणच्या पोलवरील वीज तारांची चोरी करणारी टोळी जेरबंदfile photo
Published on
Updated on

Gang stealing power lines from Mahavitaran poles apprehended

बालना, पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या पोलवरील जर्मन विज ारांसह शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पटारी, वायर तसेच सोलर वायरची चोरी करणारी टोळी बदनापूर पोलिसांनी कडली आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ बाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कला असून, दोन पिकअप वाहनांसह ० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल स्तगत केला आहे. या कारवाईमुळे परीचे तब्बल १३ गुन्हे उघडकीस आले बाहेत.

Jalna News
Jalna Rain : पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

बदनापुर तालुक्यातील पानखेडा ढोकसाळ, काजळा, रोषणगाव, हलदोला व बदनापूर परिसरात मागील काही दिवसांत जर्मन तार चोरीच्या घटना घडल्या होत्या. कडेगाव, वाघूळ, दाभाडी, डोंगरगाव व चनेगाव शिवारातुन वायर व शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रकार वाढले होते. या घटनांची दखल घेत बदनापूर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके स्थापन केली. मागील १५ दिवसांपासून तपास पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला. या तपासातून १३ गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी या प्रकरणात दिलीप गणेश शिंदे (फुलेनगर, बदनापूर), विकास भाऊसाहेब मांदळे (मातोश्री नगर, रेल्वेस्टेशन बदनापूर), विजय बाबुराव पाखरे (साठेनगर, अंबड संतोष तुकाराम पवार (शेवगा, अंबड), अभिजीत विष्णू गारोळे (नेहरू नगर, परभणी) यांच्यासह अन्य आरोपींवर कारवाई केली आहे. युसुफखान हनीफखान, अब्दुल माजिद अब्दुल कादिर व चांद मीर बागवान यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, अटक आरोपींना पाच दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे.

Jalna News
Kharif Crops : सहा लाख हेक्टरवरील खरिपाचे पीक धोक्यात

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

चोऱ्यांना आळा बसणार

कारवाईत चोरीच्या साहित्याव्यतिरिक्त दोन पिकअप वाहने असा एकूण २० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तार व मोटार केबल चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news