

Focus on increasing irrigation capacity
भोकर, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील पिंपळढव साठवण तलाव आणि सुधा प्रकल्पाची उंचीवाढविण्याचे येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. तालुक्यातील सर्व तलावांमधील गाळ काढून तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे केले तालुक्यातील रहाटी येथे १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी २५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा निमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या कार्यक्रमात खा. चव्हाण बोलत होते.
पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या सोबत असून, अशा काळात पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्धतेचे योग्य नियोजन करून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
पिंपळढव साठवण तलावाच्या कामासाठी ८५ कोटी रुपये मंजूर झाल्याने सदरील काम व सुधा प्रकल्प उंची वाढीचे दोन्ही कामे एका वर्षात पूर्ण होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातील. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जातील. शेतकरी आणि नागरिकांनी धीर सोडू नये. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे.
या कठीण काळात सरकार आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी आ. भारतीय जनता पाट मोफत आरोग्य तपासणी शिबीर श्रीजया चव्हाण, किशोर देशमुख बारडकर, जगदीश पाटील भोसीकर, दिवाकर रेड्डी, भगवानराव दंडवे, दिलीप सोनवाडे, विनोद चिंचाळकर, रामचंद्र मुसळे, राजु पाटील दिवशीकर, नामदेव आयलवाड, किशोर पाटील लगळूदकर, गणेश कापसे, बालाजी शानमवाड, माधव अमृतवाड, मल्लेश दोनतुलवाड, किशोर केसराळे, डॉ अंकुश देवसरकर यांची उपस्थिती होती प्रास्ताविक दिवाकर रेड्डी यांनी केले सुत्रसंचलन डॉ. मनोज गिमेकर यांन केले तर मल्लेश दोनतुलवाड यांन आभार मानले.
पंतप्रधान मोदी हे गरिबांचे कैवारी
गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारतसारखी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच लाख रुपयांपर्यंतचा इलाज या योजनेअंतर्गत होत असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे कैवारी आहेत. सर्वसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचेही खा. चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.