Theft Case : रिक्षातील पाच महिलांनी मारला डल्ला, हँडबॅगसह ८९ हजारांचा ऐवज लांबवला

हँडबॅग मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
Theft Case
Theft Case : रिक्षातील पाच महिलांनी मारला डल्ला, हँडबॅगसह ८९ हजारांचा ऐवज लांबवलाfile photo
Published on: 
Updated on: 

Five women in a rickshaw commit theft, make off with a handbag containing valuables worth 89,000 rupees.

जालना, पुढारी वृत्तसेवा : हँडबॅग मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २३ रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास मामाचौक ते शिवाजी महाराज पुतळा रिक्षा प्रवासादरम्यान घडला.

Theft Case
Nilgai dies car collision Jalna-Ambad highway|जालना-अबंड राज्य महामार्गावर नीलगाय अन् चारचाकी गाडीची टक्कर, नीलगायीचा मृत्यू

फिर्यादी सावित्री राजू डोंगरे (वय ३९, व्यवसायः घरकाम, रा. ३०० क्वार्टर, पन्हाळा ए बिल्डिंग, क्वार्टर क्र. २०२, जालना) या शुक्रवार, दि. २० रोजी त्या आपल्या मुलीसह आजारी आईला पाहण्यासाठी सरंबा (ता. देऊळगाव राजा.) येथे गेल्या होत्या. सोमवार, दि. २३ रोजी त्या देऊळगाव मही बसस्थानकावरून छत्रपती संभाजीनगर बसने त्या दुपारी २:१५ वाजता जालना बसस्थानकावर पोहोचल्या.

दरम्यान त्यांनी सोन्याचे दागिने व ५,५०० रुपये रोख हँडबॅगमध्ये ठेवून ती काळ्या रंगाच्या कपड्याच्या बॅगमध्ये ठेवली रिक्षात बसून त्या मामा चौकाजवळ आल्यानंतर अंदाजे ३० ते ४० वयोगटातील पाच महिला आणि त्यांच्यासोबत दोन लहान मुले रिक्षात बसली. त्यामुळे पायाजवळ ठेवलेली बॅग दिसेनाशी झाली.

Theft Case
Electricity Meters : शहरात वीज मीटरमध्ये फेरफार; महावितरणच्या पथकाची कारवाई

पाणीवेस मार्गे रिक्षा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील तिवारी मोबाईल शोरूमसमोरील रिक्षा स्टॉपवर दुपारी ३ वाजता थांबली. त्या महिला उतरल्या. रिक्षा ३०० क्वार्टर येथे पोहोचल्यावर माय-लेकींनी घरी बॅग उघडून पाहिली असता दागिन्यांची हँडबॅग चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी त्वरित सदर बाजार पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार संजय हिंगे करत आहेत.

चोरीस गेलेला मुद्देमाल

गळ्यातील सोन्याची पोत (८६ सोन्याचे मणी व २ ग्रॅमचा सोन्याचा पत्ता, अंदाजे १५ ग्रॅम) किंमत ३१,००० रुपये. ३ ग्रॅम वजनाची, बदामाचे चिन्ह असलेली सोन्याची अंगठी, किंमत १८,००० रुपये, ८ ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर, किंमत ३५,००० रुपये. रोख ५,५०० रुपये. या प्रकरणी सावित्री डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये पाच अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.