

Five accused arrested in village pistol purchase and sale case in three days
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना पोलिसांनी गावठी पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्यांविरुध्द राबविलेल्या मोहिमेत तीन दिवसांत पाच आरोपी जेरबंद करण्यात आले असून तीन पिस्तूलसह १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेने पिस्तूल खरेदी विक्रीचे रॅकेट उघड केल्याने अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल खरेदी विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथक तयार केले होते. जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल खरेदी-विक्री करून ते ताब्यात बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना १ जुलै रोजी आरोपी महेश विष्णू निचळ (रा. शिंदे वडगाव, ता. घनसावंगी) याच्याकडून ०१ गावठी पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे जप्त केले.
या प्रकरणी सदर आरोपितांविरुध्द पोलिस स्टेशन घनसावंगी येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड तसेच घनसावंगी तालुक्यात आरोपी समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद (रा. पानेवाडी, ता. घनसावंगी) व कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे (रा. गांधीनगर जालना) यांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी ३ जुलै रोजी रोजी आरोपी समीर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद याच्याकडून जाफराबाद तालुक्यातील प्रवीण विष्णू वायाळ (रा. कुंभारझरी ता. जाफराबाद) याने काही दिवसांपूर्वी एक गावठी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे खरेदी केले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्याने पिस्टल व जिवंत काडतुसे हे दामोदर अण्णा लोखंडे (रा. जाफराबाद) यास विक्री केले असल्याचे सांगितले.
दामोदर अण्णा लोखंडे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केले. तिन्ही आरोपी जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.