

Accused in Suresh Ardar kidnapping and murder case arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून राजाटाकळी येथील सुरेश तुकाराम आर्दड यांचे गावठी पिस्तूलचा धाक दाखवून २८ जून रोजी कारमधे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील तीन आरोपींना घनसावंगी पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जेरबंद केले.
राजाटाकळी येथील सुरेश तुकाराम आर्दड यांच्या अपहरण व खून प्रकरणानंतर घनसावंगी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार केली होती. आरोपी हरी कल्याण तौर (रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी), सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (रा. रजाटाकळी, ता. घनसावंगी) हिनाज बाबामिया सय्यद (रा. कुंभार पिंपळगाव, ता. घनसावंगी), महादेव अंबादास आव्हाड (रा. एकलहरा, ता. जि, छत्रपती संभाजीनगर) या आर- ोपींचा घनसावंगी पोलिसांनी जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरसह विविध परिसरात शोध घेतला मात्र आरोपींनी पोलिस पथकाला गुंगारा दिला. त्यानतंर प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी तपासाची चक्रे फिरवून चारही आरोपींना शुक्रवार (४) रोजी बीड जिल्ह्यातील गे-वराई येथून जेरबंद केले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस उपधीक्षक आयुष नोप-ाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक केतन राठोड, सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात, जमादार रंजीत वैराळ, पोलिस कर्मचारी राधेशाम गुसिंगे, प्रकाश पवार, सुनील वैद्य, संतोष एसलोटे यांनी केली आहे.
गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.