Jalna News : खबरदार, परिसर घाण कराल तर पाच हजार रुपयांचा दंड

जि.प.च्या सीईओ मिनू पी.एम. यांनी लागू केली नियमावली
Jalna News
Jalna News : खबरदार, परिसर घाण कराल तर पाच हजार रुपयांचा दंड File Photo
Published on
Updated on

Fine of Rs 5,000 for littering in the Zilla Parishad office area

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद कार्यालय परिसरात कचरा, पान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन भुंकणे, किंवा इतर कोणत्याही स्वरूपात घाण केल्यास ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड केला जाईल, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी दिले आहेत. त्या संदर्भात त्यांनी गुरुवार दि.२४ रोजी जिल्हा परिषद आवारात नियमावली लागू केली.

Jalna News
Jalna Crime News : आन्वा बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

दरम्यान, जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील शिस्त, स्वच्छता व सूचना व्यवस्थापनची नीट अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आदेश आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी दिले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील कार्यालयीन परिसर स्वच्छ व नीटनेटका राहावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी आदर्श नियमावली तयार केली. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Jalna News
Food Processing Industry : जिल्ह्यात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळत आहे गती

या नियमाचे सनियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या कार्यालयप्रमुख, सहायक प्रशासन, कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. कार्यालयाच्या भिंतीवर, दरवाज्यावर, कपाटावर, टेबलवर किंवा फर्निचरवर कुठलेही पोस्टर, फोटोज, सूचना बॅनर स्टिकर्स लावण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. असे कृत्य आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news