Water Tanker : अखेर २१ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू

आ. उढाण यांच्या पुढाकारातून मतदार संघातील गावांना टँकर मंजूर
Water Tanker
Water Tanker : अखेर २१ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरूfile photo
Published on: 
Updated on: 

Finally, water tankers deployed to quench the thirst of 21 villages

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा घनसावंगी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हिकमत उढाण यांनी पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारातून जालना ग्रामीण, घनसावंगी आणि अंबड ग्रामीणमधील पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली असून, संबंधित गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

Water Tanker
Jalna Crime| तीनपट परताव्याचे आमिष देऊन १ कोटी ३२ लाखांची फसवणूक, आरोपी जेरबंद

जालना ग्रामीणमधील चितळी पुतळी, विरेगाव आणि शिंगाडे पोखरी या गावांचा यामध्ये समावेश आहे. तर घनसावंगी तालुक्यातील दहेगव्हाण, यावलपिंप्री तांडा, हातडी, बेलवाडी, शिंदखेड अंतर्गत शिंदखेड तांडा, बोरगाव खुर्द व भीमनगर, मासेगाव व माऊलीनगर, भेंडाळा अंतर्गत भेंडाळा तांडा व बंगलेवाडी, ढाकेफळ अंतर्गत ढाकेफळ तांडा क्रमांक १ व २, रामगव्हाण, भद्रेगाव तसेच राहेरा अंतर्गत तनवाडी व राहेरा तांडा या गावांना टँकरचा आधार मिळाला आहे.

अंबड ग्रामीणमधील बेलगाव, सुखापुरी आणि शहापूर या गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी धावपळ काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे.

विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, लहान मुले आणि वृद्धांचेही हाल होत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने उपलब्ध जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत टँकर सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Water Tanker
Jalna Drought News : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन चारा पाण्याची सोय करा

प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे

दरम्यान, मतदारसंघातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे. केवळ टँकर मंजूर करून न थांबता संबंधित गावांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळते की नाही, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.