

Fenugreek greens fetching a pittance
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात भाजीपाला पिकाची अवस्था दयनीय झाली आहे. ऐन हंगामात मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एक एकर मेथीची विक्री अवघ्या आठ हजार रुपयांनी होत असून त्यातून खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाचा लहरीपणा आणि सोयाबीन, कापूस, मका या पिकांनी दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडे मोर्चा वळवला होता. विहिरीच्या पाण्यावर पिंपळगाव रेणुकाई सह भागातील शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, पालकाची लागवड केली. पीक चांगले आले, मात्र बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने भाव पार कोसळले आहेत.
एका एकर मेथीसाठी बियाणे, खते, मजुरी, पाणी, वाहतूक असा मिळून १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र व्यापारी एकरी मेथीचे ८ हजार रुपये देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात तोटाच पडत आहे.
काही ठिकाणी तर मेथी ओ कोथिंबीर विकलीच जात नसल्याने शेतकऱ्यांना ती तशीच फेकून द्यावी लागत आहे. पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळाला आ परंतु भाजीपाल्याला भाव मिळत नसल्य शेतकरी त्रस्त झाले-
मोठे संकट
कवडीमोल भावामुळे काढणीचा खर्चही परवडत नसल्याने शेतातच मेथीसह कोथिंबीर सडत आहे. जनावरांनाही कोणी घेत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने भाजीपाल्याला हमीभाव द्यावा किंवा बाजार समित्यांमध्ये दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.