

Farmers are in trouble as laborers are not available for cutting chillies
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालक्यातील आन्वा परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली होती. सध्या मिरचीचे भाव कमी झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट असून मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईच्या मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
शेतकरी मिरची तोडणीसाठी मजुरांना शिल्लकीचे पैसे देत आहेत, तरीहीं मजूर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिरची वेळेवर न तोडल्यास उत्पादन घटण्याची व खराब होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहेत. सध्या मिरची बाजारात दोन हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे. भाव कमी असूनही तोडणी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत असूनही, मजुरांअभावी त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अडथळा येतो. मिरचीची तोडणी कामांसाठी मजूर मिळेना.
मजुरांअभावी, मिरचीची तोडणी वेळेवर होत नाही, ज्यामुळे मालाची गुणवत्ता घटते आणि नुकसान होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी, मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे, पण मजुरांअभावी ती तोडता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.