

5 lakh ganja seized in Bhokardan
भोकरदन; भोकरदन तालुक्यातील नळणी शिवारामधील गट क्रमांक 135 मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे ड्रोन द्वारे सर्व्हे करून छापा मारून शेतकरी राजू सिंगल यांच्या शेतातील ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी आरोपी राजू कचरू सिंगल (वय 46, रा. नळणी) याला अटक करण्यात आली आहे.
भोकरदन पोलिसांना गुप्त खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की नळणी शिवारातील राजू सिंगल याच्या शेतामध्ये त्याने कपाशीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी या भागात ड्रोन चा सर्वे केला. त्यामध्ये गांजाची झाडे आढळून आली त्यावरून पोलिसांनी अचानक तेथे छापा मारून राजू सिंगल या शेतकऱ्याच्या शेतातून कपाशीच्या पिकांमध्ये लावलेली गांजाची झाडे जप्त केली. गांजाच्या झाडांचे वजन 19 किलो 800 ग्रॅम असून बाजार भाव प्रमाणे या गांजाची किंमत चार लाख 95 हजार रुपये होते.
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे केशव नेटके, पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव, किशोर मोरे, शरद शिंदे लक्ष्मण रानगोते संदीप भुतेकर, गणेश पिंपळकर , सोमनाथ मंडलिक , चालक ज्ञानेश्वर जाधव, यांच्या विशेष पथकाने केली.
या कारवाईमध्ये पोलिसांसोबत महसूलचे व कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. पोलीस, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली. याप्रकरणी राजू कचरू सिंगल याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.