Gold Purchase : गुरुपुष्यामृत योगातही सोने खरेदीचा उत्साह मंदावला

जालना सराफा बाजारपेठेतील चित्र, पाऊस लांबल्याने उलाढालीवर विपरीत परिणाम
Gold Purchase
Gold Purchase : गुरुपुष्यामृत योगातही सोने खरेदीचा उत्साह मंदावला file photo
Published on
Updated on

Enthusiasm for buying gold remained subdued even during the auspicious Guru-Pushyamrut Yoga

जालना, पुढारी वृत्तसेवा : सुवर्ण खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) जालना सराफा बाजारात अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. दरवर्षी या योगाच्या निमित्ताने सोन्याच्या खरेदी-विक्रीत मोठी उलाढाल होत असते.

Gold Purchase
Renapur cattle market | बैल बाजार : दीड वर्षात अवघ्या दोन-अडीचशेच बैलांची विक्री

मात्र यंदा लांबलेला पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, नुकतीच पार पडलेली लग्नसराई आणि धोंड्याचा महिना यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी झाल्याने सोने खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुरुवारी जालना सराफा बाजारात सोन्यायचा भाव १ लाख ५२ हजार रुपये अधिक ५ टक्के जीएसटी असा होता. तर चांदीचा भाव २ लाख ४५ हजार रुपये किलो असल्याची माहिती मिळाली.

गुरुपुष्यामृत योग असल्याने सराफा व्यावसायिकांनी मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा ठेवली होती. काही ठिकाणी विशेष सवलती व आकर्षक योजनाही जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र बाजारात ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी राहिली. सोने खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी प्रतीकात्मक स्वरूपात एक ग्रॅम किंवा लहान वजनाचे दागिने खरेदी करून शुभमुहूर्त साधल्याचे दिसून आले.

Gold Purchase
bullock pair prices : खरिपाच्या तोंडावर बैल बाजारात मोठी उलाढाल

दरम्यान, दिवसअखेर काही प्रमाणात खरेदी वाढली असली तरी गुरुपुष्यामृत योगानिमित्त अपेक्षित असलेली मोठी उलाढाल झालेली नसल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे यंदाचा गुरुपुष्यामृत योग सराफा बाजारासाठी संमिश्र प्रतिसाद देणारा ठरला.

पाऊस लांबल्याने ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सध्या फारशी समाधानकारक नाही. पावसाअभावी शेतकरीवर्ग चिंतेत असून त्याचा परिणाम बाजारपेठेवरही होत आहे. तसेच अलीकडेच झालेल्या विवाह सोहळा व धोंड्याच्या महिन्यामुळे अनेक कुटुंबांचा खर्च वाढला. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक खर्चाला प्राधान्य देत सोन्याच्या खरेदीकडे सावध भूमिका घेतल्पाचे गुरुवारी पहावयास मिळाले-
भरत गादीया, भरत ज्वेलर्स जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news