Jalna News : शासकीय जागेवर अतिक्रमण; अंबड नगरपालिकेचा हातोडा

शहरातील न्यायालयासमोरील सर्व्हे क्रमांक ८ मधील शासकीय जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी (दि.२६) नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली.
Jalna News
Jalna News : शासकीय जागेवर अतिक्रमण; अंबड नगरपालिकेचा हातोडाfile photo
Published on: 
Updated on: 

Encroachment on government land; Ambad Municipal Council takes sledgehammer to it

अंबड, पुढारी वृत्तसेवाः शहरातील न्यायालयासमोरील सर्व्हे क्रमांक ८ मधील शासकीय जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी (दि.२६) नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली. भुजंग पवार यांच्यासह सहा जणांच्या अतिक्रमित घरांवर ही कारवाई करण्यात आली. गुन्हेगारीच्या दोन घटना घडल्यानंतर पोलिस व नगर परिषद प्रशासन सक्रिय होऊन ही कारवाई करण्यात आली.

Jalna News
Jalna News : मांगणी नदीला झाडाझुडपांचा विळखा

दि. २१ रोजी अंबड शहरात तणावाचे वातावरण निर्माण करणारी घटना घडली होती. गावठी कट्ट्याच्या सहाय्याने धमकावणे तसेच चारचाकी वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बबलू भुजंग पवार, विशाल ऊर्फ गुण्या भुजंग पवार, विनोद भुजंग पवार व कुणाल पवार यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याच ठिकाणी छापा टाकून आठ धारदार शस्त्रे जप्त केली होती. यामध्ये दोन मोठ्या तलवारींचा समावेश होता. या नंतर नगर परिषद प्रशासनाने भुजंग पवार, बबलू भुजंग पवार, विशाल ऊर्फ गुण्या भुजंग पवार, विनोद भुजंग पवार, राजकुमार भुजंग पवार व शरद भुजंग पवार या सहा जणांना सर्व्हे क्रमांक ८ मधील अतिक्रमण काढण्याबाबत २३ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. मुदत संपल्यानंतर गुरुवारी सकाळी नगर परिषदेचे पथकाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवले. ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अतिक्रमणधारकांत खळबळ माजली आहे.

Jalna News
Jalna News : महापालिकेच्या शाळेने घेतला मोकळा श्वास

असा होता फौजफाटा

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम साळी, पोलिस निरीक्षक संतोष बोडके यांच्यासह एक डीवायएसपी, तीन पोलिस निरीक्षक, आठ पोलिस अधिकारी आणि सुमारे शंभर पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. राखीव पोलिसांची दोन पथके, दगडफेक प्रतिबंधक हेल्मेट व इतर सुरक्षा साहित्य तसेच आवश्यक शस्त्रांसह पोलिस कर्मचारी तैनात होते.

नगर परिषदेकडून पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि विविध विभागांतील सुमारे ५० कर्मचाऱ्यांची पथके कारवाईसाठी तैनात करण्यात आली होती. मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पथक प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता गणेश ठुबे हे उपस्थित होते. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे पाच कर्मचाऱ्यांचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.