Report power theft via WhatsApp : वीज चोरीसह धोकादायक वीज यंत्रणेची माहीती आता व्हॉटस ॲपवर

वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महावितरणकडुन जालना जिल्ह्यासाठी उपक्रम
Report power theft via WhatsApp
वीज चोरीसह धोकादायक वीज यंत्रणेची माहीती आता व्हॉटस ॲपवर pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या विद्युत सुरक्षिततेसाठी तसेच वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून महावितरणतर्फे एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. धोकादायक वीजयंत्रणा आणि वीजचोरीबाबत नागरिकांनी महावितरणला तात्काळ माहिती देण्यासाठी दोन स्वतंत्र व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

वीजचोरीची माहिती देण्यासाठी 9011075200 हा व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाकलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारा अशा धोकादायक वीजयंत्रणेबाबत तसेच चुकीच्या वीजबिलाबाबत तक्रार करण्यासाठी 9011075600 हा स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

Report power theft via WhatsApp
Supreme Court hearing on Khula law : पतीच्या संमतीशिवाय मुस्लीम महिला घटस्फोट घेऊ शकते का?

शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धोकादायक वीजयंत्रणा आढळून येते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी अशा बाबी निदर्शनास आणून देण्यासाठी संबंधित व्हाट्सॲप क्रमांकावर केवळ फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज केवळ सोमवार ते शनिवारी या दिवशी सकाळी 10 ते 5 या वेळेतच पाठवावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठवलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी,निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे किंवा संबंधित इतर शासकीय कार्यालयांकडे पाठवण्यात येतील आणि त्याबाबत संबंधित तक्रारदारांना कळवण्यात येईल.

Report power theft via WhatsApp
Police recruitment Nanded : नांदेडमध्ये भावी पोलिसांची आजपासून भरती प्रक्रिया सुरू

वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत असून त्याचा परिणाम प्रामाणिक वीजग्राहकांवर होतो. वीजचोरीबाबत गोपनीय स्वरूपात माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सुरक्षित वीज पुरवठेसाठी पाऊल

सुरक्षित वीजपुरवठा, अपघातमुक्त परिसर आणि प्रामाणिक वीज वापर यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले असून, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जबाबदारीने वापर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news