जालना : डोमलगाव येथे 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद आढळला

जालना : डोमलगाव येथे 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद आढळला

शहागड; पुढारी वृत्तसेवा : अबंड तालुक्यातील डोमलगाव येथे अनिकेत घरच्या स्लॅबवर पडून होता. यावेळी शेजारील नागरिकांनी त्याला आवाज दिला असता त्यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर नागिरिकांनी घरात जावून त्याला बघितले असता तो निपचुप अवस्थेथ पडला होता. त्याची हालचाल होत नसल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती गावातील पोलीस पाटील इंद्रजीत पाटील यांना दिली. यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही माहिती समजताच पोलीस पाटील यांनी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना दिली. यानंतर खांडेकर यांनी शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, पो.का. सुशील करंडे यांना माहिती दिली. यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षक शेख ,पो.का. कारंडे यांनी अनिकेतला शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टऱ्यांनी सात त्याला मृत घोषित केले. अनिकेतचे शवछेदन करत त्यांचा विसियारा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेसाठी राखून ठेवण्यात आलेला आला आहे. यातून अनिकेतचा मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

अनिकेत ससाणे हा अविवाहित तरुण असून तो शेतात शेतमजूर म्हणून काम काम करत होता. तो घरी असताना तिथे इतर कोणी नव्हते. आई-वडील भावजाई आणि भाऊ पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news