Jalna News : कोरडवाहू शेतीतून फक्त कर्ज उगवतं....

भोकर तालुक्यातील शंभर टक्के शेती ओलिताखाली येईल का ?
Jalna News
Jalna News : कोरडवाहू शेतीतून फक्त कर्ज उगवतं....file photo
Published on: 
Updated on: 

Dryland farming only generates debt

भोकर, पुढारी वृत्तसेवा : पावसाची अनियमितता वरचेवर वाढत आहे. याचा फटका सगळ्यात जास्त कोणाला बसत असेल तर ते कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसतोय. कोरडवाहू शेतीतून फक्त आणि फक्त कर्ज उगवत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आहे. या अवघड परिस्थितीतून शेतकऱ्यांना वर काढायचे असेल तर भोकर तालुक्यातील शंभर टक्के शेती ओलिताखाली आणणे आवश्यक आहे. पण असं होत नसल्याने वरचेवर भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.

Jalna News
Jalna News : साखर कारखाना फेब्रुवारीअखेर सर्व ऊस उचलणार

मागील चाळीस पन्नास वर्षांपूर्वी पाण्याचा वापर कमी होता. सध्या पाणी वापरात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. पाण्याचा वापर प्रचंड वाढलेला आहे. यामुळे भूजल पातळी दरवर्षी खालावत आहे. उन्हाळ्यात जमिनीच्या अंतर्गत खोलवर असलेले क्षारयुक्त पाणी वापरावे लागते. यावर एकच उपाय म्हणजे जलसंधारण ची कामे हाती घ्यावी लागणार आहे. जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पावसाचा थेंब न थेंब अडविणे व जिरवणे आवश्यक आहे.

पावसाचे शुद्ध पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे व पाण्याची गुणवत्ता वाढणे हे काम प्रत्येक गावात, प्रत्येकाने प्राधान्य तत्त्वावर करण्याची गरज आहे पण, याबाबत केवळ आश्वासन दिले जाते हिख्यागार शेतीचे स्वप्न दाखविले जाते पण मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होत हे तालुक्याचे दुर्दैव आहे. तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याच्या बाहेरून शेती सिंचनासाठी पाणी घेता येत नाही. आणि मोठ्या प्रकल्पासाठी तशी मोठी साइड ही उपलब्ध नाही.

तालुक्यात जी काही तोकडी सिंचन व्यवस्था आहे तिच्यावर केवळ १३ टक्के शेती सिंचनासाठी येते. सध्या सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचा व पिंपळढव साठवण तलाव चा प्रश्न मार्गी लागत असले तरी सिंचनात फार मोठी वाढ होणार नाही.

Jalna News
Jalna News : नापिकीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांचेही हाल !

सद्यपरिस्थितीत शेतीतून निघणारे उत्पन्न व मिळत असलेला बाजार भाव याची जुळवाजुळव बरोबर होत नाही. ज्या शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडत आहे. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे. आज घडीला कोरडवाहू शेतीतून फक्त आणि फक्त कर्ज उगवत आहे.

तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी येथील पाणी पातळी वाढावी म्हणून पाझर तलाव, लघु तलाव, प्रकल्प, सिंचन तलाव कोल्हापुरी बंधाऱ्यासह ५५ तलाव आहेत खरे पण या पैकी केवळ आठ तलावावर शेती सिंचनाखाली येत आहे तर उर्वरित तलावाची अवस्था दयनीय झाली असल्याने हे तलाव सिंचनासाठी तितकेसे उपयुक्त नाहीत. या मुळे तलाव खंडीभर अन् सिंचन मूठभर अशी अवस्था असलेल्या भोकर तालुक्यात सिंचन व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे.

यावर्षी शेतीखर्च प्रचंड वाढला आहे. अशा स्थितीत एकही हंगाम हातातून गेल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याचा धोका आहे. १९७२ चा दुष्काळही भीषण होता. त्यावेळी अन्नधान्याची मारामार असल्याने खडी फोडून कामाच्या मोबदल्यात सुकडी खावून, आंबील पिऊन लोक जगले. यावेळी अन्नधान्याचा तुटवडा तेवढा जाणवणार नसला तरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. याला कारणीभूत सिंचनाचा अभाव ठरतो आहे.

logo
Pudhari News
pudhari.news