Drone Seeding : जालन्यात ओसाड डोंगरावर ड्रोन सीडिंग

जालना फस्टचा उपक्रम, खादगाव एमआयडीतील डोंगरावर २५० किलो बीज प्रसारित
Drone Seeding
Drone Seeding : जालन्यात ओसाड डोंगरावर ड्रोन सीडिंगfile photo
Published on
Updated on

Drone seeding on a barren hill in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा : बेसुमार वृक्षतोडीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक डोंगर ओसाड झाले असून नैसर्गिकरीत्या बियांचा प्रसार व नवीन वृक्षांची निर्मिती होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर जालना फस्टच्यावतीने "ड्रोन सीडिंग २०२६" हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला असून, रविवार (12) रोजी पहिल्या" दिवशी खादगाव एम. आय. डीन. सी फेज 3 जवळील वनक्षेत्र तसेच शासकीय जागेवर अत्याधुनिक ड्रोनच्या साहाय्याने दुर्गम व पोहोचण्यास कठीण अशा डोंगर उतारांवर स्थानिक व भारतीय वृक्षप्रजातींच्या उत्कृष्ट दर्जाचे 25- किलो बीज 25 हेक्टर परिसरात प्रसारित करण्यात आले.

Drone Seeding
Nuclear tension Middle East | युरेनियम, इराण आणि ‘अणू तणाव’

या माध्यमातून नैसर्गिक वननिर्मितीला चालना मिळून भविष्यात डोंगर पुन्हा हिरवेगार व वृक्षसंपन्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पहिल्या दिवशी 25 हेक्टर परिसरात 250 किलो बीज प्रसारित करण्यात आले. ड्रोन सीडिंगसाठी वड, पिंपळ, लिंब, चिंच, सीताफळ, पेरू, * करंज, अंमलतास, खैर, अर्जुन, पळस यांसारख्या कमी पाण्यावर वाढणाऱ्या आणि स्थानिक हवामानाशी सुसंगत भारतीय वृक्षप्रजातींच्या बियांची निवड करण्यात आली आहे.

जालना फस्टच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, भूजल संवर्धन तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Drone Seeding
Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी

यावेळी जेष्ठ उद्योजक सुनीलभाई रायठठ्ठा, कुंडलिका सीना फाऊंडेशनचे उदय शिंदे, जालना फस्टचे कृष्णा बगडीया, 100 सोशल क्लबचे डॉ. विठ्ठल राजकर, प्रा. मोहन शिंदे, समस्त महाजनचे सुदाम खुणे, आकाश, सचीन बसैये, वनविभागाचे मधुकर ढाकणे, वृक्षसंजीवनी फाऊंडेशनचे ब्रदीनाथ जाधव, सचीन पारे, प्राईम ड्रोन्सचे अमोल पाटील आणि विनोदराय इंजिनिअर्सचे निवृत्ती गजर यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचा आगामी काळात फायदा होणार आहे.

जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. ज्या डोंगराळ भागात प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करणे कठीण आहे, अशा ठिकाणी ड्रोन सीडिंग हे प्रभावी पर्याय ठरू शकते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट दर्जाच्या बियांचे नियोजनपूर्वक प्रसारण करण्यात आले आहे." या अभियानासाठी कृषी विज्ञान केंद्र, जालनायांनी योग्य वृक्षप्रजातींची निवड, बियाण्यांवर बुरशी व कीड प्रतिबंधक प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांचेही मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले.
- आयुष गर्ग, प्रकल्प प्रमुख जालना फस्ट
जालना येथे विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ड्रोनचा या उपक्रमासाठी वापर करण्यात आला आहे. वननिर्मितीच्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न असून पर्यावरण संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- प्रदुम्न मानधनी, प्राईम ड्रोन्स, जालना
ड्रोनच्या माध्यमातून बीज प्रसारणाचा हा अभिनव उपक्रम आमच्या वनक्षेत्रात सुरू झाल्याचा आनंद आहे. या अभियानात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग राहील आणि भविष्यात हा परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील."
- बळीराम मोरे, माजी सरपंच, खादगाव
पर्यावरण संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात जालना जिल्हा अधिक वृक्षसंपन्न करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील.
- दुर्गेश अग्रवाल, प्रकल्प प्रमुख जालना फस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news