Jalna water shortage : डोणगावात एक महिन्यापासून पाणीटंचाई

पाण्यासाठी भटकंती, विकतचे पाणी घेण्याची वेळ
Jalna water shortage
डोणगाव ः गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. (छाया ः शेख फेरोज)
Published on
Updated on

डोणगाव ः जाफराबाद तालुक्यातील डोणगावात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिला-पुरूष यांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते. एक टॅकरसाठी तब्बल नऊशे रूपये मोजावे लागते.

डोणगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाच विहिरी असून त्यामध्ये दोन विहिरींना उन्हाळा असल्यामुळे विहिरीनी तळ गाठला आहे. परंतू सावखेडा भोई येथून पाझर तलाव येथील व अकोला देव जीवरेखा धरण पाझर तलाव च्या दोन ठिकाणीचे दोन्ही पाझर तलाव भरलेले आहे. पाणी असूनही तिथून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे गावात मागील एक महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने करण्यात यावे.

Jalna water shortage
Shahapur water crisis : शहापुरात पाणीटंचाईच्या तीव्र झळा

अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून जल जीवन मिशनंतर्गत दहा किलोमीटर वरून पाणी आणण्यात आलेले. परंतू ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गावात मागील तीन महिन्यापासून पाणीपुरवठा बंद आहे.

Jalna water shortage
Palghar Water Scarcity: पालघरमध्ये मार्चमध्येच पाणीटंचाईची झळ; १२ पाड्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ

ग्रामसेवक व इतरांनी लक्ष घालून तातडीने गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. नसता ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

गावातील ग्रामपंचायत नलद्वारे पाणीपुरवठा होणारा गेल्या दोन ते चार दिवसात पाणीपुरवठा सुरत होईल. विदर्भातील सावखेडा भोई येथील पाझर तलावातून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणारी पाईपलाईन फुटले असल्यामुळे त्याचे काम सुरू आहे. लवकरच गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

आर. आय. मोगल, ग्रामसेवक

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात एक महिन्यापासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.

सुभाष रजाळे, ग्रामस्थ

गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सार्वजनिक नलद्वारे होणारा पाणीपुरवठा एका महिन्यापासून बंद आहे. ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

मोहम्मद आनिस मणियार, ग्रामस्थ

ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये होणारा जारपुरवठा बंद असल्यामुळे जार पुरवठा तातडीने सुरू करावे. जार पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत लक्ष करून जार पुरवठा सुरळीत करावा.

आप्पासाहेब हिवाळे, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news