Jalna News : मत्स्योदरी देवीच्या चरणी सव्वादहा लाखांची देणगी

संस्थानच्यावतीने प्राप्त देणगीची मोजदाद, सोने व चांदीसह विविध वस्तू
Jalna News
Jalna News : मत्स्योदरी देवीच्या चरणी सव्वादहा लाखांची देणगीfile photo
Published on
Updated on

Donation of ₹10.25 lakh offered at the feet of Goddess Matsyodari

जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंबड येथील प्रसिद्ध श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने भाविकांकडून प्राप्त झालेल्या देणगीची मोजदाद करण्यात आली. यामध्ये रोख रक्कम, चिल्लर तसेच सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश असून, रोख व चिल्लर मिळून तब्बल १० लाख ४१ हजार ५७६ रुपये इतकी रक्कम प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.

Jalna News
Jalna Agricultural Produce Market Committee : चमकी मुगाला ८,५०० रुपयांचा भाव ! शाळू ज्वारीची रेलचेल

संस्थानकडे जमा झालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या ४७२ नोटा म्हणजे २ लाख ३६ हजार रुपये, २०० रुपयांच्या १८७ नोटा म्हणजे ३७ हजार ४०० रुपये, १०० रुपयांच्या २ हजार ८५० नोटा म्हणजे २ लाख ८५ हजार रुपये, ५० रुपयांच्या ३ हजार ३६८ नोटा म्हणजे १ लाख ६८ हजार ४०० रुपये, २० रुपयांच्या ६ हजार ९८८ नोटा म्हणजे १ लाख ३९ हजार ७६० रुपये, तर १० रुपयांच्या ७ हजार ९४७ नोटा म्हणजे ७९ हजार ४७० रुपये आहेत. या नोटांची एकूण रक्कम ९ लाख ४६ हजार ३० रुपये आहे.

Jalna News
Jalna News : सोयाबीन व कापसासाठी तुषारचा सिंचनाचा आधार

याशिवाय २० रुपयांची १७५, १० रुपयांच्या ५ हजार २०९, ५ रुपयांच्या ४ हजार २८६, २ रुपयांच्या ५ हजार ५६२ आणि १ रुपयाच्या ७ हजार ४०२ नाण्यांसह चिल्लरची रक्कम २५ हजार ५४६ रुपये झाली. अशा प्रकारे नोटा व चिल्लर मिळून १० लाख ४१ हजार ५७६ रुपये देणगी जमा झाली. देणगीची मोजदाद संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार सोमेश मोहिते, सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने, विश्वस्त पुजारी गिताविलास कुंटेफळकर, व्यवस्थापक कैलास शिंदे, सुरेंद्र पोतदार, उमेश काळवणे तसेच मुकेश गोसावी, अंबादास भवर, गोविंद कायस्थ, अरुण भवर, अर्जुन शिंदे, नामदेव राठोड, डिंगाबर खरात आणि महेंद्र खरात यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

देणगीत चांदीचे डोळे व प्रतिमा

देणगीत सोन्याची पोत, त्यात ६५ मणी व सोन्याचे पेंडल, सोन्याचे पाच छोटे डोरले, ४३ सोन्याचे लहान मणी आणि सोन्याची एक लहान प्रतिमांचा समावेश आहे. चांदीचे पॉलिश केलेले दोन घोडे, चांदीचे १६ टीपके, मोती, चांदीचे विविध आकारांचे डोळे, जोडवे, चांदीचे पॉलिशचे डोळे आणि चांदीचे एक रुपयाचे नाणे अशा मौल्यवान वस्तूही संस्थानकडे भाविकांनी अर्पण केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news