

District Generates ₹190 Crore in Revenue from Stamp Duty!
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा उपनिबंधक मुद्रांक शुल्क व दस्त नोंदणी विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला मिळालेल्या २०५ कोटी रुपयांच्या महसूल उद्दिष्टापैकी तब्बल १९० कोटी ७९ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्याने एकूण ९३.७टक्के उद्दिष्टपूर्ती केली असली तरी, विविध तालुक्यांमधील कामगिरीत मोठी तफावत दिसून आली आहे. यामध्ये बदनापूर कार्यालयाने सर्वाधिक १३४ टक्के वसुली करत बाजी मारली आहे.
मुद्रांक शुल्क विभागाला दस्त नोंदणी आणि मुद्रांक विक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. जालना जिल्ह्यासाठी प्रशासनाने २०५ कोटींचे वार्षिक उद्दिष्ट दिले होते. आर्थिक वर्षअखेर जिल्ह्याने या उद्दिष्टाच्या अगदी जवळ मजल मारली आहे. मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील काही कार्यालयांची कामगिरी थंडावल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास बदनापूर कार्यालयाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. १४ कोटींचे उद्दिष्ट असताना या कार्यालयाने १८.८६ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. जालना शहर (सह दुय्यम निबंधक) कार्यालयाने ६० कोटींच्या तुलनेत ६२.२९ कोटी जमा करत १०३ टक्के कामगिरी केली आहे. दुसरीकडे, जाफराबाद (५७.७५ टक्के), जालना क्रमांक ३ (६१.९७ टक्के) आणि भोकरदन (६६.४५ टक्के) या कार्यालयांना मात्र अपेक्षित महसूल गोळा करता आला नाही.
जिल्ह्याची एकूण कामगि समाधानकारक असली तरी, कम महसूल असणाऱ्या विभागांव आगामी काळात प्रशासनाला लन केंद्रित करावे लागणार आहे.