मुद्रांक शुल्क भरा अन् कुणाची मालमत्ता नावावर करून घ्या

शहरातील रजिस्ट्री कार्यालयांमध्ये नेमके चाललेय काय ?
sambhajinagar news
मुद्रांक शुल्क भरा अन् कुणाची मालमत्ता नावावर करून घ्याfile photo
Published on
Updated on

Pay the stamp duty and have any property transferred to your name

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर शहरातील दस्त नोंदणी कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या मालमत्ता नावावर करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. मुद्रांक शुल्क भरा आणि कोणाची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घ्या, असाच प्रकार सध्या या कार्यालयांमध्ये सुरू आहे. दस्त नोंदणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही पडताळणी होत नाही. भविष्यात फसवणुकीचा प्रकार उजेडात आलाच तर स्वतः दुय्यम निबंधक फिर्यादी होऊन पोलिसांत तक्रार दाखल करतात. गेल्या वर्षभरात शहरात असे दहापेक्षा जास्त प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

sambhajinagar news
Aurangabad Bench order : संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती रोखली

शहरात पाच दस्त नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दलालांचा नेहमीच सुळसुळाट असतो. शिवाय काही खासगी व्यक्तीही या कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे काम करतात. काही दिवसांपूर्वी नोंदणी उपमहानिरीक्षकांनी केलेल्या पाहणीवेळीही बाहेरील व्यक्ती खुर्चीत बसून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे आढळून आले होते.

अशाच या कार्यालयांमध्ये बोगस दस्त नोंदणीचे प्रकारही वाढले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या परस्पर त्याची मालमत्ता दुसरेच कुणी तरी बनावट कागदपत्रे तयार करून तिसऱ्या व्यक्तीला विक्री करत आहे. फसवणूक टाळण्यासाठी शासनाने आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक केले आहे. मात्र आधारची साईट बंद असल्याचे कारण देऊन त्यालाही फाटा दिला जात आहे. त्यामुळे असे प्रकार वाढले आहेत.

sambhajinagar news
Parbhani News | निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा भोवला ; बीएलओविरुद्ध गुन्हा दाखल

जबाबदारी कोणाची ? अधिकाऱ्यांचे हात वर

फसवणुकीचा प्रकार उजेडात आल्यावर सह दुय्यम निबंधक पोलिसांत तक्रार देतात. भारत मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ चे कलम ५५ नुसार दस्तातील मिळकतीचे मालक, मालकी हक्क व दस्तऐवजाची मिळकत व त्याचे हक्क तपासणीचे व पडताळणीचे अधिकार लिहून देणार व लिहून घेणार यांचे आहेत. दस्ताची नोंदणी अधिनियमानुसार सत्यता पडताळणीचे व चौकशीचे अधिकार दुय्यम निबंधकास नाहीत, असे नमूद करून संबंधितांविरोधात तक्रार दिली जाते.

अशी आहे दस्त नोंदणीची प्रक्रिया

मालमत्ता खरेदी-विक्री किंवा भाडे करारासाठी दस्त नोंदणी ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. यात प्रामुख्याने ऑनलाईन डेटा एंट्री, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरणे, दुय्यम निबंधक कार्यालयात अपॉइंटमेंट घेणे आणि दोन्ही बाजूंच्या साक्षीदारांसह स्वाक्षऱ्या व बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे समाविष्ट आहे. वकील किंवा दस्तऐवज लेखकाकडून खरेदीखत, भाडेकरार, बक्षीसपत्र तयार करून घेतले जाते.

त्यानंतर नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर आय-सरिता प्रणालीद्वारे दस्तऐ-वजाचा डेटा ऑनलाईन भरावा लागतो. मालमत्तेच्या बाजारमूल्यानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावे लागते. नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची वेळ व तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या वेळी, खरेदीदार, विक्रेते आणि दोन साक्षीदार यांच्या उपस्थितीत निबंधकासमोर आधार व्हेरिफिकेशन करून दस्त नोंदणी केली जाते.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बनावट दस्तऐवज तयार करून मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. फसवणूक होऊ नये म्हणून आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक केले आहे. मात्र, बर्याच वेळा आधार व्हेरिफिकेशनची साईट बंद असते. त्यावेळी हे लोक असे प्रकार करतात. शिवाय काही प्रकरणात बनावट व्यक्तींचेही आधार व्हेरिफिकेशन झाल्याचे आढळून आले आहे. वर्षभरापासून आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. संभाजीनगरच नव्हे तर अंबड, भोकरदान, जालना आदी ठिकाणीही आम्ही असे गुन्हे दाखल केले आहेत.
- विजय भालेराव, नोंदणी उपमहानिरीक्षक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news