Smart Meter : स्मार्ट वीज ग्राहकांना ४० लाखांची सवलत

मंडळात ५२ हजार १७ ग्राहकांनी बसविले स्मार्ट वीज मीटर
Smart Meter Discount Meter
Smart Meter : स्मार्ट वीज ग्राहकांना ४० लाखांची सवलतpudhari photo
Published on
Updated on

Discount of Rs 40 lakhs for smart electricity customers

जालना, पुढारी वृत्तसेवा : :

महावितरणच्यावतीने स्मार्ट वीजमीटर बसवलेल्या जालना मंडळातील ५२ हजार १७ ग्राहकांना ३९ लाख ७० हजार ७६५ रुपये सवलत मिळाली आहे.

Smart Meter Discount Meter
पारंपरिक टरबूज वाडी इतिहासजमा

परिमंडलातील ५२ हजार १७ग्राहकांना घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर (टाइम ऑफ डे) गेल्या सात महिन्यांत जवळपास ३९ लाख ७० हजार ७६५ रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांनी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरू झाला आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

Smart Meter Discount Meter
लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येत आहे.

त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

घरगुती ग्राहकासाठी दिवसा सवलत

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news