Diesel Shortage : नांगरणी, वखरणीची कामे रखडली

घनसावंगी तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतींना बसला ब्रेक; शेतकरी चिंतेत
Diesel Shortage
Diesel Shortage : नांगरणी, वखरणीची कामे रखडली file photo
Published on
Updated on

Diesel Shortage: Ploughing and Harrowing Operations Stalled

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच तालुक्यात डिझेल तुटवड्याची समस्या गंभीर बनू लागली आहे. डिझेलचा अपुरा पुरवठा होत असल्याने अनेक ट्रॅक्टर जागेवरच उभे राहत असून नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर यांसारखी महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. परिणामी खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Diesel Shortage
Ghansawangi Diesel Shortage : डिझेल टंचाईमुळे मशागतीची कामे रखडली

गेल्या काही दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पहाटेपासूनच ट्रॅक्टर चालक डिझेलसाठी थांबत असले तरी अनेकदा अपुरा पुरवठा किंवा डिझेल संपल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही पंपांवर मर्यादित प्रमाणातच डिझेल दिले जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिक वाढली आहे.

मान्सूनपूर्व काळात शेतकरी पावसाआधी मशागत पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतात. काळ्या जमिनीची नांगरणी, वखरणी करून शेत पेरणीयोग्य करण्याचे काम सुरू असतानाच डिझेल तुटवड्याने शेतीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे. अनेक ट्रॅक्टर दिवसन् दिवस उभे राहत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही वाढत आहे.

Diesel Shortage
Beed Fuel Shortage | आष्टीत खरीप हंगामाच्या तोंडावर इंधन टंचाई; पंपांवर रांगा, शेतीची कामे ठप्प

यावर्षी आधीच खतांचे वाढलेले दर, बियाण्यांची महागाई आणि शेती साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच डिझेल टंचाईमुळे शेतीचा खर्च आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी खासगी स्तरावर जादा दराने डिझेल विक्री होत असल्याच्या चर्चाही ग्रामीण भागात सुरू आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलासा द्यावा खते, बियाणे आणि औषधींचा खर्च वाढला आहे. आता डिझेल तुटवड्यामुळे शेतीचा खर्च आणखी वाढला आहे. पावसाआधी शेतीची तयारी पूर्ण झाली नाही तर त्याचा थेट परिणाम पेरणीवर होणार आहे. शासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. -
शरद आधुडे, शेतकरी, शिंदखेड
जिल्हा प्रशासनाने दिलासा द्यावा मान्सूनपूर्व मशागतीची ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर बंद पडत आहेत. पहाटेपासून पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे दिवसाचे नियोजन पूर्णपणे बिघडत आहे. -
नितीन घोगरे, ट्रॅक्टर चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news