Jalna News : 'त्या' अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश

तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना
 Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Departmental Inquiry Ordered Against 'That' Officer

जालना, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद जालना पंचायत विभागाने दनापूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात गंभीर तक्रारींची दखल घेत विभागीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्याने कामकाजात कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

 Crime News
MLA Suresh Dhas : विकासासाठी गट-तट विसरून कामाला लागा

प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालय काजळा/पानखेडा, दावलवाडी व घोटण येथील कामकाजात अनियमितता आढळल्याच्या तक्रारी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यास स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने पुढील चौकशीचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 Crime News
Nanded News | हदगाव तहसीलदारांच्या आदेशाला मंडळ अधिकाऱ्यांची केराची टोपली; ३ दिवसांचा अहवाल तीन महिन्यांपासून प्रलंबित

चौकशीसाठी सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांच्या मार्फत प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आवश्यक कागदपत्रे, पुरावे व साक्षीदारांची यादी जोडण्यात आली आहे. चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून, चौकशी अधिकारी यांनी तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात सादरकर्त्या अधिकाऱ्यांवरही चौकशी प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नियमांनुसार संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news