

Demand for extortion from education officials, case registered at Taluka Jalna Police Station
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्हा परिषदेच्या तात्कालीन तथा वाशिम येथील शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांना पंचवीस लाखाची खंडणी मागीतल्याच्या आरोपावरुन मनिष गोविदराव भाले यांच्या विरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, मी २००२ पासुन भाग्योदय नगर अंबड रोड जालना येथे कुटुंबासह राहते. जालना जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणुन २३ फेब्रुवारी २०२२ पासुन ९ जुन २०२५ पर्यंत कार्यरत होते.
सध्या मी वाशिम येथे शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणुन कार्यरत आहे. १४ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास आपण खाजगी वाहन चालक संदीप नास्तिक रत्नपारखे याच्यासह भाग्योदय नगर येथील राहत्या घरी असतांना मनिष गोविंदराव भाले (रा. भाग्यनगर जुना जालना) हा माझ्या घरी आला. त्याने तुमच्या कार्यकाळातील काही प्रस्ताव आहेत.
त्यावर तुम्ही पाठीमागच्या तारखेच्या सह्या करुन द्या अशी मागणी केली. त्यास मी नकार दिला. यावेळी भाले याने तुम्ही सह्या केल्या नाहीत तर मी तुमच्या वरिष्टांकडे खोट्या तक्रारी करुन तुमची नोकरी घालवेल. मी अखिल भारतीय माहिती कार्यकर्ता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे.
मी शिक्षण आयुक्तांकडे तुझ्या अपसंपदाची माहिती दिली आहे. जर हे सगळ थांबवायचे असेल तर पंचवीस लाख रुपये दे नाही तर तुझ्या विरोधातील सर्व माहिती वर्तमान पत्र, न्युज चॅनल व सोशल मिडियावर देउन बदनामी करेन अशी धमकी दिली. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.