Onion cultivation : दानापूरसह परिसरामध्ये कांद्याचे पीक बहरले

आन्वा ः तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा
Danapur Bhokardan onion cultivation
आन्वा ः भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात कांद्याचे पीक बहरले आहे. (छाया ः सादिक शेख)
Published on
Updated on

आन्वा ः भोकरदन तालुक्यातील दानापूर आणि परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. सध्या हे पीक चांगले बहरले असून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील मिरची, मका, कापूस व सोयाबीन ही पिके हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते.

Danapur Bhokardan onion cultivation
Latur society plot fraud : लातुरात बनावट कागदपत्रांद्वारे सोसायटीच्या प्लॉटची विक्री

तालुक्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील जुई धरण शंभर टक्के भरले. शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची लागवड केली.

दानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कांदा पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.

Danapur Bhokardan onion cultivation
Jalna News : अनधिकृत होर्डिंग हटवा; अन्यथा गुन्हा

योग्य नियोजन करून कांदा लागवड

मागील वर्षी सुरुवातीपासून कमी पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी साठा झाला नव्हता, परंतू ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या पाण्याचे योग्य नियोजन करून कांदा लागवड केली. सध्या कांदा चांगला बहरलेला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news