Latur society plot fraud : लातुरात बनावट कागदपत्रांद्वारे सोसायटीच्या प्लॉटची विक्री

13 जणांवर गुन्हा दाखल
Latur society plot fraud
लातुरात बनावट कागदपत्रांद्वारे सोसायटीच्या प्लॉटची विक्रीfile photo
Published on
Updated on

लातूर : शहरातील जुना औसा रोड भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या श्री दत्तकृपा सहकारी भाडेकरू गृहनिर्माण संस्थेत एक कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेच्या प्लॉटची अवैध विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि निबंधकांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाडगाव रोड भागातील श्री दत्तकृपा सहकारी गृहनिर्माण (भाडेकरू मालकीधारक) संस्था मर्यादित ही 1981 पासून कार्यरत असलेली एक नामांकित संस्था आहे. 29 जून 2018 रोजी संस्थेच्या प्लॉट क्रमांक 24 वर बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या भगवंत जगन्नाथ जोशी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून या प्लॉटचे बनावट खरेदीखत तयार केले.

Latur society plot fraud
Beed News : रस्ता नसल्याने शेतकऱ्याचा ऊस अडकला

हा व्यवहार करताना सहकारी गृहनिर्माण संस्था कायद्याचे उल्लंघन करून संस्थेची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. देविदास रामराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व न्यायालयाच्या आदेशानुसार भगवंत जगन्नाथ जोशी, यशवंत जगन्नाथ जोशी, सुधीर दिगंबर नाईक, उत्तम गोपाळ देशमुख, राघवेंद्र माधव चिडगोपेकर नामदेव किसन माळी , बाबु लक्ष्मण गायकवाड, शशिकला बसवराज भाटसंगे, द्वारकादास मोतीलाल बजाज ,राजाराम नारायण बिलोलीकर, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, लातूर, डॉ. संजय हनुमंतराव शिंदे (प्लॉट खरेदीदार) व मीरा संजय शिंदे यांच्याविरोधात आरोपींवर विश्वासघात, फसवणूक , बनावट कागदपत्रे तयार करणे आणि दस्तऐवजात फेरफार करणे याअंतर्गत येणाऱ्या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

Latur society plot fraud
Jalna News : सिंचन, साखर उद्योगाच्या प्रश्नावर सभागृहाचे वेधले लक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news