Jalna Cyber Fraud | सायबर फसवणूक : १ लाख ७४ हजारांचा गंडा, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तीन ऑनलाइन व्यवहारांतून रक्कम वळती; सायबर पोर्टलवर तक्रार
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on: 
Updated on: 

अंबड : अंबड शहरातील हुसेन मुबारक बाशन यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यूपीआयच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून १ लाख ७४ हजार ६६० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर गुन्हे पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. या प्रकारामुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी यूपीआयच्या माध्यमातून तीन आर्थिक व्यवहार झाले. यामध्ये पहिल्या व्यवहारात ३३ हजार ६६७ रुपये, दुसऱ्या व्यवहारात ४४ हजार २२१ रुपये, तर तिसऱ्या व्यवहारात ९६ हजार ७७२ रुपये अशा एकूण १ लाख ७४ हजार ६६० रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. या व्यवहारांमुळे हुसेन मुबारक बाशन यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Cyber Fraud
Jalna Short Circuit Farm Fire : शॉर्टसर्किटमुळे अडीच एकर ऊस जळून खाक

या प्रकरणातील व्यवहारांचा तपशील तपासला असता, एचडीएफसी बँक आणि भारतीय स्टेट बँकेशी संबंधित खात्यांचा उल्लेख आढळतो. एचडीएफसी बँकेशी संबंधित ९६ हजार ७७२ रुपये, तर भारतीय स्टेट बँकेशी संबंधित ७७ हजार ८८८ रुपये अशा दोन व्यवहारांची रक्कम तक्रारीतील तपशीलानुसार प्रलंबित असल्याचे नमूद आहे.

या प्रकरणी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून २४ मिनिटांनी सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधित रक्कम कोणत्या माध्यमातून आणि नेमकी कशा प्रकारे वळती झाली,या व्यवहारांमागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत निष्कर्ष काढता येत नाही.

Cyber Fraud
Jalna Water Scarcity | पाणीटंचाई : जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news