Jalna News : आधुनिकतेच्या झगमगाटात संस्कृतीचा ठेवा हरवतोय

ग्रामीण भागातील शेणाच्या गवळणी, पाडव्याची परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर
jalna news
आधुनिकतेच्या झगमगाटात संस्कृतीचा ठेवा हरवतोयfile photo
Published on: 
Updated on: 

Cultural treasures are being lost in the blaze of modernity

अविनाश घोगरे

घनसावंगी : दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, फराळ, पणत्या, आकाशकंदील आणि रोषणाईचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात दिवाळीच्या सणाला शेती, पशुधन आणि लोकसंस्कृतीशी जोडणाऱ्या अनेक पारंपरिक प्रथा होत्या. त्यापैकीच शेणापासून गवळणी आणि पाडवा तयार करण्याची परंपरा आज काळाच्या ओघात लोप पावत आहे. आधुनिकतेच्या झगमगाटात ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल ठेवा हरवण्याची भीती व्यक्त होत आहे.

jalna news
Jalna News : मक्याच्या गंजी जळून खाक

पूर्वी दिवाळीच्या दिवसांत गावोगावी घरासमोर शेणाने सारवलेले अंगण आणि त्यामध्ये तयार केलेल्या शेणाच्या गवळणी, पाडवा व त्यांची केली जाणारी पूजा असे पारंपरिक चित्र पाहायला मिळत असे. घरातील महिला, ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुले एकत्र येऊन शेणापासून विविध प्रतीकात्मक आकृत्या तयार करीत असत. फुले, हळद-कुंकू आणि पूजासाहित्याने या आकृत्या सजविल्या जात. या माध्यमातून लहान मुलांना धार्मिक परंपरा, लोकजीवन आणि शेती संस्कृतीची ओळख करून दिली जात होती.

गवळणींच्या परंपरेचा संबंध भगवान श्रीकृष्णाच्या गोपाल संस्कृतीशी जोडला जातो. तर दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बळीराजाच्या स्मरणाशी संबंधित ग्रामीण प्रथांनाही महत्त्व आहे. गाईचे शेण हे ग्रामीण जीवनात पवित्र आणि उपयुक्त मानले जाते. घराचे अंगण सारवण्यापासून ते शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या परंपरेत धार्मिकतेसोबतच पर्यावरण आणि कृषी जीवनाचे महत्त्वही दडलेले आहे.

मात्र, बदलती जीवनशैली, शहरांकडे वाढते स्थलांतर, विभक्त कुटुंबपद्धती आणि नव्या पिढीचा पारंपरिक प्रथांमधील कमी होत चाललेला सहभाग यामुळे या परंपरांचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी आजी-आजोबा मुलांना या प्रथांमागील कथा सांगत असत. आज मात्र अनेक मुलांना शेणाच्या गवळणी आणि पाडवा का तयार केला जातो, याची माहितीही

jalna news
Jalna News : शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीच ठरणार आधारवड : डॉ. श्रीकृष्ण सोनुने

मोजक्याच घरांत परंपरेचे जतन !

पूर्वी घराघरांत उत्साहाने जपली जाणारी ही परंपरा आता मोजक्याच घरांपुरती मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे पारंपरिक ग्रामीण प्रथा मागे पडत आहेत. ज्येष्ठ महिलांकडे या परंपरेचा मौखिक वारसा असून त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला या प्रथांची माहिती मिळणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.