Jalna News : शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीच ठरणार आधारवड : डॉ. श्रीकृष्ण सोनुने

सध्याची बदलती हवामान परिस्थिती, अनियमित पर्जन्यमान, वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे शेती व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
Jalna News
Jalna News : शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीच ठरणार आधारवड : डॉ. श्रीकृष्ण सोनुनेfile photo
Published on: 
Updated on: 

Integrated farming methods will be important for farmers: Dr. Srikrishna Sonune

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : सध्याची बदलती हवामान परिस्थिती, अनियमित पर्जन्यमान, वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे शेती व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा प्रतिकूल दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ एका पिकावर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांची जोड देणारी एकात्मिक शेती पद्धती स्वीकारणे काळाची गरज आहे. एकात्मिक शेती पद्धतीच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन संकटातून बाहेर काढण्यास मदत करू शकते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण सोनुने यांनी केले.

Jalna News
Crop loan : महाराष्ट्र बँकेत पीक कर्ज वाटप संथ गतीने

जाफराबाद तालुक्यातील सांजोळ नाला येथे अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र आणि शिवारफेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. सोनुने बोलत होते.

सोनुने म्हणाले की, शेतीतील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, पीक पद्धतीमध्ये विविधता, पाण्याचे काटेकोर नियोजन, फळबाग लागवड, पशुपालन, कुकूटपालन तसेच शेतीपूरक व्यवसाय यांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होऊ शकते. शेतकऱ्यांनी बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित शेतीकडे वळणे आवश्यक आहे. केवळ उत्पादन वाढविण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी संघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला.

Jalna News
Jalna Drought News : दुष्काळात पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाला कुलूप

शेतीला टिकून ठेवण्याची गरज

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना केवळ मदतीची नव्हे, तर शेतीत टिकून राहण्यासाठी शाश्वत पर्यायांची गरज आहे. याच उद्देशाने अॅग्रोव्हिजन गटशेती संघाच्या माध्यमातून आयोजित होणारी नियमित मासिक चर्चासत्रे ही शेतकऱ्यांसाठी ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शनाची प्रभावी व्यासपीठे ठरत आहेत असे गौरोदगारही डॉ. सोनुने यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.