Crime News : गावठी पिस्तूल अन् ३ काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद !

मध्यरात्री जुन्या बस स्टॉपवर सापळा; ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त!, कदीम पोलिसांची कारवाई
Crime News
Crime News : गावठी पिस्तूल अन् ३ काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद !file photo
Published on: 
Updated on: 

Crime News: Criminal arrested with village pistol and 3 cartridges

जालना, पुढारी वृत्तसेवाः रेल्वे स्टेशनजवळील जुन्या बस स्टॉप परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर हत्यारासह थांबलेल्या एका अट्टल आरोपीच्या कदिम जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई रविवार, (दि. १८) रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), ३ जिवंत काडतुसे आणि मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime News
Jalna News : दुर्गादेवी विसर्जनासाठी कुंडावर जय्यत तयारी; महापालिका सज्ज

गौरव ऊर्फ गणेश योगराज मांडोळे (वय २६, रा. रूपनगर, अंबड चौफुली, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कदिम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांना १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, जुना जालना येथील रेल्वे स्टेशनजवळील जुन्या बस स्टॉपवर एक इसम बेकायदेशीर घातक हत्यार बाळगून उभा असून तो काहीतरी गंभीर गुन्ह्याची तयारी करत आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक शेवाळे यांनी तात्काळ ही माहिती पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कदिम जालना पोलिसांचे एक विशेष पथक त्वरित घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले. आरोपीकडे अत्यंत घातक आणि गंभीर स्वरूपाचे हत्यार असल्याची माहिती असूनही, पोलिस पथकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रेल्वे स्टेशन परिसरात अत्यंत शिताफीने व गनिमी काव्याने सापळा रचला. रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गौरव मांडोळे याला जाळ्यात ओढून ताब्यात घेण्यात आले.

Crime News
Jalna News : बनावट एसएसआरपी नंबर प्लेट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त !

त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे १६ सेमी लांबीचे गावठी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा), मॅगझिनमध्ये भरलेली ३ हजार रुपये किमतीची ३ जिवंत पितळी काडतुसे आणि २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ६००/२०२६, कलम ३, २५ शस्त्र अधिनियम (आर्म्स अॅक्ट) १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे पिस्तूल कोठून आणले आणि तो कोणता गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता, याचा पुढील तपास कदिम जालना पोलिस करत आहेत.

या पथकाने बजावली कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळे, पो.उ.नि. अमोल चाटे, अंमलदार सदाशिव राठोड, सचिन चौधरी, धनाजी कावळे, मतीन शेख, इम्रान खान, पो. का. तराळ (सर्व नेमणूक कदिम जालना पोलीस ठाणे) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. सागर बाविस्कर यांच्या पथकाने फत्ते केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news