Jalna civic issues : तुंबलेल्या नाल्या, पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे जालन्यात नागरिकांचा जीव धोक्यात

महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात काँग्रेस आक्रमक
Jalna civic issues
जालनाः शहरातील वाढती अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या, पिसाळलेली कुत्री या विरोधात काँग्रेसच्यावतीने महापालिकेला निवेदन देण्यात आले.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः जालना शहरात वाढती अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले आहे. या गंभीर प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने जालना महानगरपालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत महापालीकेला निवेदन दिले.

निवेदनात म्हंटले आहे की, जालना शहर कचऱ्याच्या विळख्यात अडकले असून रस्त्यांवर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. संग्राम नगर, कन्हैया नगर, लालबाग, इंडियन नगर, नॅशनल नगर, चंदनझिरा, साठे नगर तसेच जुना जालना भागात नाल्यांमध्ये गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

Jalna civic issues
Belgaum dog attack: पिसाळलेल्या कुत्र्याचा तिघांवर हल्ला

पावसाळा तोंडावर असतानाही नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात नुकत्याच एका पिसाळलेल्या कुत्र्याने जुना जालना भागात धुमाकूळ घालत लहान मुलांसह आठ नागरिकांना घेतला. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalna civic issues
Sangli firing : गोळीबाराने कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

आंदोलनाचा इशारा

प्रशासन जागे झाले नाही तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, नगरसेवक अमजद पठाण, नगरसेवक आसिफ अन्सारी, दिनेश सुराणा, रघुवीर गुडे, सुरज येलगंटीवार, चंद्रकांत रत्नपारखे, नाना शेवाळे, दिग्विजय दांडगे, वसीम कादरी, भरत लोढा, अंकुश शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news