

Conduct an impartial investigation into the 500-crore case : Jarange
जालना, पुढारी वृत्तसेवा आंदोलन चिरडण्यासाठी कथितरीत्या पैसे पुरवले जात असल्याचा आरोप होत असेल, तर त्याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारामागील सत्य शोधून काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे नाव येत असेल, तर त्यांनी पैसे घेतले आहेत का, याचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. त्यांनी पैसे घेतले नसतील, तर त्यांची विनाकारण बदनामी होता कामा नये, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी (दि. २३) अंकुशनगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.
या प्रकरणातील कथित रेकॉर्डिंगची सत्यता तपासून त्यामागील वास्तव उघड करावे. केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रेकॉर्डिंग खोटे असल्याचे सांगून जबाबदारी टाळू नये. सरकारकडे तपासासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे तांत्रिक तपास करून सत्य काय आहे, हे स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारला आवश्यक ती मदत करण्यास आणि सहकार्य देण्यास आम्ही तयार आहोत. सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा, सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होईल. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांनी, विशेषतः मराठा सामाजिक कार्य करणाऱ्या ओबीसी नेत्यांनीही सतर्क राहावे. सर्व जाती-धर्मातील सामान्य नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. या प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे किती खोलात जाऊन करतात, याकडे आमचे लक्ष असेल. सत्य बाहेर आले नाही, तर सरकारवरील विश्वास उडेल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथकाला (एसआयटी) सक्षम आणि प्रामाणिक
सहकाऱ्यांवर थेट संशय व्यक्त करणे दुर्दैवी : शेलार
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत सामंजस्याची भूमिका मांडली. शेलार म्हणाले की, "ज्या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही, त्यावर लगेच आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. उदय सामंत किंवा रामदास कदम यांचा काहीतरी मोठा गैरसमज झाला असावा. अधिकृत तपास यंत्रणांचे अहवाल येण्याआधी महायुतीमधील सहकाऱ्यांवर थेट संशय व्यक्त करणे दुर्दैवी आहे." तर दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या या क्लिपच्या मागच्या 'मास्टरमाइंड'चा शोध घेण्यासाठी एसआयटी किंवा सायबर सेल मार्फत तात्काळ फॉरेन्सिक तपास करण्याची मागणी लावून धरली.
महायुती बुडविण्याचा धंदा बंद करा : आ. प्रसाद लाड
या मुद्दयावर रामदास कदमांच्या आरोपांनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अत्यंत आक्रमकपणे पलटवार केला. लाड म्हणाले, "रामदास कदम यांनी आता दुसरी बाजू घेऊन 'संजय राऊत होण्याचा आणि महायुती बुडवण्याचा फालतू धंदा तातडीने बंद करावा. जरांगे पाटील यांच्यासोबतच्या माझ्या सर्व भेटी लपूनछपून झालेल्या नव्हत्या, तर त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्ण संमतीने आणि कल्पनेनेच झाल्या होत्या." लाड यांनी पुढे थेट इशारा दिला की, "जर आमच्यावर असेच बिनबुडाचे आरोप सुरू राहिले, तर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबद्दल रामदास कदम यांची स्वतःची अंतर्गत काय ऑडिओ क्लिप आहे, ती आम्ही बाजारात आणू." तसेच, एकनाथ शिंदेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याची सुपारी स्वतः कदम यांनीच घेतली आहे की काय, असा प्रतिसवालही त्यांनी केला.
हा लोकशाहीचा खून; राज ठाकरेंचा संताप
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. राज ठाकरे म्हणाले, "हा केवळ ५०० कोटी रुपयांचा विषय नाही, तर कशाप्रकारे छुपे प्लॅनिंग केले जाते, तो मूळ प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील सारख्या माणसाला आधी बरोबर घ्यायचे, नंतर त्यांना बदनाम करायचे आणि त्यांचीच जवळची माणसे कशी फोडायची, हे जे काही सुरू आहे ते अतिशय धक्कादायक आहे. हे प्लॅनिंग करणारे कोण आहेत ते आम्हालाही ठाऊक आहेत. आज सत्तेत असलेल्या लोकांनी नीट विचार करावा, उद्या ज्यावेळी तुमची सत्ता जाईल ना, त्यावेळी या सर्व गोष्टी तुमच्याच अंगाशी येणार आहेत, याचा यांना अंदाज नाही."
५०० कोटी गेले कुठे? 'ईडी-सीबीआय' गप्प का? : संजय राऊत
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून थेट भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. राऊत म्हणाले, "ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरून हे स्पष्ट होत आहे की, मराठ्यांचा आवाज दाबण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मोठी डील झाली आहे. श्रीकांत शिंदेंना भाजपकडून ५०० कोटी दिल्याचे सांगितले गेले, मग ते ५०० कोटी नेमके गेले कुठे? कोणाच्या खिशात गेले? हा सरळ-सरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार आहे. यावर ईडी (ED) आणि सीबीआय आता का गप्प आहेत?" राऊत यांनी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस