Jalna Cold Wave : 'आज जिल्ह्यात थंडीची लाट, दक्षता घ्या'

थंडीपासून बचावासाठी मफलरचा वापर करावा
Jalna Cold Wave
Jalna Cold Wave : 'आज जिल्ह्यात थंडीची लाट, दक्षता घ्या'Pudhari News network
Published on
Updated on

'Cold wave in the district today, be careful'

जालना, पुढारी वृत्तसेवा : कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. १७ ते १८ नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या दोन दिवशी तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी, आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Jalna Cold Wave
Custard apple : नऊ वर्ष जपलेल्या सीताफळाच्या चौदाशे झाडांवर फिरवला जेसीबी

जिल्ह्यात लाट येण्याची शक्यता असल्याने काय करावे व काय करू नये याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे आहेत याची खात्री करावी. ३. प्रसार माध्यमाव्दारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचना अमलात आण्याव्यात. एकटे रा-हणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष दयावे. गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या खोलीमध्ये वास्तव्य करावे. रूम हिटर चा वापर करावा. गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे.

Jalna Cold Wave
Bhokardan : आघाडीत बिघाडी तर महायुतीही फिस्कटली

विद्युत प्रवाह खंडित झाल्यास फ्रीजमधील खाण्याचे पदार्थ ४८ तास व्यवस्थित राहू शकतात. फक्त त्याचा दरवाजा व्यवस्थित लागतो का ते पहावे व जास्त वेळा उघडू नये. थंडीपासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा मफलरचा वापर करावा. रॉकेलच स्टोव्ह किंवा कोळश्याची शेगडी वापरत असाल तर त्याचा धूर जाण्यासाठी खिडकी उघडी असावी अन्यथा दूषित धुरामुळे बाधा होऊ शकते. ताजे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news