घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद, पाच घरफोड्या उघड

सराईत करणाऱ्या दि.२८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
Jalna Crime News
घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद, पाच घरफोड्या उघडFile Photo
Published on
Updated on

Burglary accused arrested, five burglaries uncovered

जालना, पुढारी वृत्तसेवा : सराईत करणाऱ्या दि.२८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ५ घरफोडी व चोरीचे गुन्ह्याची त्याने माहिती दिली.दरम्यान, जालना जिल्हयामध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे उघड करुन आर-ोपींचा शोध घेवुन कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या.

Jalna Crime News
Jalna News : शिक्षकांचा हिरावलेला टप्पावाढ घोषित करा

त्यानुसार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी रमेश हिरामण वाघ, ३८, रा. यो-गेशनगर, जालना यांनी त्यांचे राहते घरांचा कडीकोयंडा तोडुन ७ हजार रुपये रोख व रु. ६० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल केली होती.

शनिवार, दि. २८ रोजी अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना योगेशनगर भागातील चोरी प्रकरणातील आरोपीचा पोलिसांना सुगावा लागला. आरोपी भारतसिंग कपुरसिंग बावरी, २६, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना व त्याच्या साथीदाराने ही चोरी मिळुन केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली.

Jalna Crime News
दोन कोटींतून उभारली जाणार निवासस्थाने

त्यानुसार तो त्याच्या राहत्या घरी गुरुगोविंदसिंगनगर, जालना येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने तालुका पोलीस ठाणे येथे त्याच्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीतास पुढील तपासकामी तालुका पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, दत्ता वाघुंडे, अशोक जाधवर यांनी केली आहे.

आरोपीकडून रोख ६ हजार, २५ हजारांचे दागिने जप्त, आणखी गुन्हे उघड होणार आरोपीकडे आणखी गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने तालुका पोलीस ठाणे, गोकुळधाम, इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ, जालना येथील घरफोडी, तालुका पोलीस ठाणे, लक्ष्मीनगर, जालना येथील घरफोडी, तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राजपुतवाडी, जालना येथील लोखंडी सळई चोरी.

सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील जिजामाता कॉलनी, जालना येथील लोखंडी सळई चोरीचे गुन्हे त्याचा फरार साथीदारासह मिळुन केल्याची कबुली दिली आहे. आरोपी भारतसिंग कपुरसिंग बावरी, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना याचे ताब्यातुन रु.६ हजार रोख व रु. २५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news