मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव

उत्पादनात घट होण्याची शक्यता; मार्गदर्शन करण्याची गरज
Bhuri infestation on the chili crop
मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भावfile photo
Published on
Updated on

Bhuri infestation on the chili crop

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: मिरची पिकावर 'लाल्या' किंवा पिवळेपणा आणणारे मुख्यत्वे भुरी हा बुरशीजन्य रोग आणि चुरडा-मुरडा हा विषाणूजन्य रोग आहेत. सतत चे ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि रसशोषक किडींमुळे या रोगांचा प्रादुर्भाव जलद होतो व पाने लाल किंवा पिवळी पडून गळत असल्याचे दिसून येत आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. सध्या ढगाळ वातावरण असून त्याचा परिणाम मिरचीच्या पिकावर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

Bhuri infestation on the chili crop
Jalna News : जिह्यातील अडीचशे कार्यालयात 'पॉश'ची अंमलबजावणी नाही !

भोकरदन तालुक्यात यंदा जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड करण्यात आली आहे. या मिरचीला दर मिळाल्याने यंदाही मे महिन्यापासून मिरची लागवडीत वाढ झाली होती. पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी कृषीपंपांवर मिरची रोपांची लागवड करुन संगोपन सुरु केले होते. गत तीन महिन्यात मिरचीच्या रोपांमध्ये वाढ होवून पाने बळकट होण्यास प्रारंभझाला असल्याने शेतकरी सुखावले होते. परंतू गत १५ दिवसांपासून वेळोवेळी ढगाळ वातावरण असल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील आर्द्रता बदलत असल्याने मिरचीवर 'भुरी' नावाच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पानांच्या खालच्या बाजूला लालसर सारखी बुरशी जमा होत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. यामुळे झाडे कोमेजून आणि आकस्मिक मर रोग येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाची बाजू कमकुवत असल्याने शेतकरी विहिर व कूपनलिकांच्या पाण्यावर मिरची लागवड करीत पोषण व संगोपन करीत आहेत.

Bhuri infestation on the chili crop
Jalna News : जाफराबाद गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्लॅबला गळती
गेल्या पंधरवड्यापासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील आर्द्रता बदलत असल्याने मिरचीवर 'भुरी' नावाच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पानांच्या खालच्या बाजूला लालसर सारखी बुरशी जमा होत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. यामुळे झाडे कोमेजून आणि आकस्मिक मर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून हजारो रूपयांची फवारणी करून ही काही फायदा होत नाही. -
- सुनील जाधव, शेतकरी कुकडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news