

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पारध पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई 25 एप्रिल रोजी दुपारी साडेएक वाजेच्या सुमारास वालसावंगी येथील बसस्थानक परिसरात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तुकाराम हरी वाघ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 90 मिलीच्या देशी दारूच्या 107 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या साठ्याची एकूण किंमत सुमारे 6 हजार 420 रुपये आहे.
संबंधित आरोपी विनापरवाना दारू साठवून विक्रीच्या उद्देशाने ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुसरी कारवाई याच दिवशी दुपारी बुलढाणा-अजिंठा रोडवरील वाढोणा येथील हॉटेल सह्याद्री येथे करण्यात आली.
येथे अरुण सुखदेव गवळी याच्या ताब्यातून 180 मिलीच्या देशी दारूच्या 15 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत सुमारे 1 हजार 500 रुपये आहे. आरोपी बेकायदेशीररीत्या दारू विक्रीसाठी साठा बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणांमध्ये पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) ई अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार पी. एन. सिनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणाचा तपास एस. जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.