Satara Police: नव्या एसपींचा कारवायांचा धडाका

पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे; 12 जणांवर गुन्हे
Satara Police: नव्या एसपींचा कारवायांचा धडाका
Published on
Updated on

सातारा : नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारताच कारवायांचा धडका लावला. त्यांच्या सूचनेनुसार शहरासह तालुका परिसरात पोलिसांनी चक्री व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून संशयितांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये संगणक, दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप, जुगाराचे साहित्य असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि 12 जणांवर कारवाई केली.

पहिली कारवाई बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील शेडमध्ये छापा टाकला. याप्रकरणी अभिजित चौगुले (वय 33, रा. मंगळवार पेठ, सातारा) व गणेश कुऱ्हाडे (43, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या कारवाईत संगणक, दुचाकी व मोबाईल असा 78 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई नागेवाडी येथे नीळकंठ सावंत (48, रा. नागेवाडी) याच्यावर केली. त्याच्याकडून 760 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.

तिसरी कारवाई राजवाडा परिसरातील जनावरांच्या दवाखाना परिसरात केली. अनिल वाघमारे (45, रा. गुरुवार पेठ) याच्याकडून शाहूपुरी पोलिसांनी 900 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. चौथी कारवाई परळी येथे केली. तालुका पोलिसांनी प्रतीक जाधव (25, रा. अंबवडे बु.) व सोमनाथ मनवे (29, रा. मानेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, दोन दुचाकी असा 1 लाख 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला .

पाचवी कारवाई गुरुवार परज, येथे मनोज माने (53, रा. बुधवार पेठ) याच्यावर शहर पोलिसांनी केली. त्याच्याकडून 1,150 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केलेे. सहावी कारवाई सातारा बसस्थानक परिसरात केली. याप्रकरणी संतोष जनार्दन शेळके (50, रा. शेळकेवाडी), सुनील नारायण अवघडे (33, रा. सैदापूर), सोमनाथ चोरगे (रा. रविवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून 6,214 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सातवी कारवाई सदर बाजार येथे केली. याप्रकरणी अश्पाक गुलाब शेख (36), तोसिफ मज्जिद शेख (दोघे रा. सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 1,050 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news