Onion seed cultivation issue : कांदे बीज उत्पादक शेतकरी अडचणीत

कांद्यांवर मधमाशांचा वावर नसल्याचा परिणाम
Onion seed cultivation issue
पिंपळगाव रेणुकाई ः कांदे पिकाला तुषारद्वारे पाणी देण्यात येत आहे. (छाया ः संदीप देशमुख)
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा बीज लागवड केली आहे. परंतु या कांद्यांवर मधमाशांचा वावर नसल्यामुळे कांदे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. परिसरात थोड्याफार शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. परंतु या खांद्यावर मधमाशी नसल्याने कांद्यामध्ये बीज भरण्यात विलंब होऊन बीज भरला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Onion seed cultivation issue
Temperature impact on harvesting : उन्हाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

कांद्याला दोन हजार भाव होता. शेतकऱ्यांनी एकरी दहा ते बारा क्विंटल कांदा आणून आपल्या शेतात लागवड केली होती. पण सध्या कांद्याच्या बीजवर मधमाशा नसल्याने कांद्यात बी येत नसल्याचे दिसून येत आहे.

Onion seed cultivation issue
Weather update Jalna : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; नागरिक हैराण

यावर्षी मी एक एकर कांदा लागवड केला आहे. परंतु यावर मधमाशा नसल्याचे फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ज्ञानेश्वर देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news