Jalna Crime : कोपर्डा शिवारात साडेतीन लाखांची गांजाची झाडे पकडली

एका आरोपीवर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Illegal Cannabis Cultivation
Illegal Cannabis Cultivationpudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारात बेकायदेशीररीत्या मानवी जीवितास हानिकारक असलेल्या ओल्या गांजाच्या झाडांची लागवड करून संगोपन करणाऱ्या एका आरोपीवर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दशरथ शेळके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवार(१५) रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे भोकरदन पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी कोपर्डा शिवारातील शेत गट क्रमांक १०१ मधील शेतात अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी मधुकर किसन पाबळे (, रा. कोपर्डा) याच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले.

Illegal Cannabis Cultivation
Matsyodari Devi Temple Ambad : मत्स्योदरी देवीच्या सातव्या माळेला होणार अलोट गर्दी

पोलिसांनी घटनास्थळावरून पांढऱ्या गोणीमध्ये भरलेली ७ हजार २२० किलोग्रॅम वजनाची, अंदाजे ३ लाख ६१ हजार रुपये किमतीची गांजाची २ झाडे, गांजाच्या झाडाची ओलसर माती असा ३ लाख ६१ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • आरोपीने स्वतःच्या शेतात बेकायदेशीरपणे अमली पदार्थाची लागवड केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने हे करत आहेत.

Illegal Cannabis Cultivation
Rajinikanth Jailer 2 : वयाच्या पंच्याहत्तरीतही थलायवाची क्रेझ, तमिळ सुपरस्टारसमोर अनेक चित्रपट फुस्स..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news