Jalna Accident : भरधाव पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भोकरदन-जालना रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळ अपघात
Jalna Accident News
Jalna Accident News file photo
Published on: 
Updated on: 

जालना :भोकरदन ते जालना रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या पिकअप चालकाने एका दुचाकीला कट मारून अपघात केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विकास चिंतामण बोर्डे (वय २८, रा. दगडवाडी, ता. भोकरदन) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत विकास बोर्डे हा राजुर येथील एका नेत्रालयात सहाय्यक म्हणून काम करत होता. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास तो कामावरून सुटल्यानंतर मालकाची मोटारसायकल (क्र.एमएच २०, एपी८५०९) घेऊन राजुर येथून आपल्या गावाकडे (दगडवाडी) जात होता.

Jalna Accident News
Jalna Water Scarcity | पाणीटंचाई : जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर

भोकरदन ते जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीजवळ आला असता, समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाच्या (क्र.एमएच २१, बीएच ४१६९) चालकाने चुकीच्या पद्धतीने आणि रॉंग साईडने भरधाव वेगात ओव्हरटेक केले.

या दरम्यान पिकअपने विकासच्या दुचाकीला कट मारल्याने पिकअपच्या हुकाचा गंभीर दणका त्याच्या डोक्याला बसला. घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी व स्थानिकांनी विकासला तत्काळ ग्रामीण रुग्णालय, भोकरदन येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

Jalna Accident News
Jalna Accident : गारटेकीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

या प्रकरणी मृत विकासच्या बहिणीने (कविता प्रज्ञासागर दाडंगे, रा. सिल्लोड) दिलेल्या तक्रारीवरून भोकरदन पोलिसांनी पिकअप वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(a), आणि १२५(b) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार विकास उत्तमराव जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news