Jalna chilli cultivation : शेतकऱ्यांचे लक्ष हिरव्या सोन्याकडे

पिंपळगाव रेणुकाई परिसरात मिरची लागवडीला जोर
Jalna chilli cultivation
पिंपळगाव रेणुकाई ः शिवारात मिरची लागवड करताना शेतकरी. (छाया ः संदीप देशमुख)
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह करंजगाव, शेलुद, लिहा, रेलगाव, कोसगाव या परिसरात मिरची लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे सोनं म्हणून ओळखली जाणारी मिरची हा मुख्य नगदी पीक बनत आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, फक्त पिंपळगाव रेणुकाई मंडळातच यंदा शेकडो हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जवळपास 30 टक्के ने जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत मिरचीला मिळालेला चांगला भाव आणि मार्केटची जवळी असल्याने शेतकऱ्यांचा कल मिरचीकडे वाढला आहे. त्यामानाने मिरची कमी कालावधीत आणि चांगले पैसे देते.

Jalna chilli cultivation
Parbhani news | उपगृह पीक पाहणी रिपोर्ट अन् कृषी मंडी आवक अहवालामुळे पीक विमा भरपाईत होणार घट

एकरी 15-20 क्विंटलपर्यंत उत्पादन निघते.” मात्र वाढलेल्या लागवडीमुळे चिंताही वाढली आहे. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर वाढला असला तरी मजूर टंचाई आणि किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य प्रश्न आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्या हिरव्या मिरचीला जर हवामानाने साथ दिली आणि दर टिकून राहिले तर यंदा पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांना मिरची खरंच सोनं ठरेल, अशी आशा आहे. मात्र उत्पादन वाढल्याने दर पडण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे.

मुख्य बाजारपेठ

पिंपळगाव रेणुकाईकात मिरचीची मुख्य बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत राज्य इतर राज्यातील व्यापारी खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपले ठाण मांडून असतात ही मिरची बाहेर देशात एक्सपोर्ट केले जाते. त्यामुळे या मिरचीला जास्त मागणी असल्याने व्यापारी घेण्यासाठी ठाण मांडून. या मिरचीमुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे.

Jalna chilli cultivation
Diesel price hike impact : डिझेल महागाईचा मच्छीमारांना फटका; दहा हजार बोटी नांगरावर

सध्या उन्हाचा तीव्र पारा असल्या कारणाने मिरची लागवडीसाठी मजुरांची मोठी पंचायत निर्माण होत आहे. मात्र हिरव्या मिरचीला लवकर लागवड केल्यानंतर चांगला भाव मिळेल या अपेक्षेमुळे मिरची लागवड करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news