Chhatrapati Sambhajinagar RTO Office : आरटीओ कार्यालय करोडीत, हेलपाटे वैजापूरला

अधिकारी दारात असूनही वाहनधारकांची फरपट; वेळ, पैसा आणि इंधनाचा अपव्यय
Chhatrapati Sambhajinagar RTO Office
Chhatrapati Sambhajinagar RTO Office pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयाचा कारभार आता करोडी येथील इमारतीतून चालत आहे. याच कार्यालयाच्या परिसरातील वाहनधारकांना मात्र कामकाजासाठी वैजापूर गाठावे लागत आहे. करोडी, वडगाव कोल्हाटी, तिसगाव, बजाजनगर, राजापूर, आणि सिडको वाळूज महानगर या संभाजीनगर तालुक्यातील गावांतील नागरिकांना जवळच्या कार्यालयाचा लाभ मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालय दारात असतानाही कामासाठी वैजापूरला हेलपाटे मारावे लागत आहेत.

करोडी, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, तिसगाव आणि सिडको वाळूज महानगर परिसरात नागरी वस्ती वाढली असून, औद्योगिक क्षेत्रामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. या भागातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना आणि इतर कामांसाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र, कार्यालयाच्या अगदी दारात असलेल्या वाहनधारकांना दुसऱ्या तालुक्यातील कार्यालयात जाण्याची वेळ येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar RTO Office
Vaibhav Sooryavanshi Post: दोन शब्द, दोन इमोजी... सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सूचक पोस्ट व्हायरल

विशेष म्हणजे, संबंधित गावे संभाजीनगर तालुक्यात येत असतानाही त्यांचा समावेश वैजापूर आरटीओ कार्यालयात करण्यात आला आहे. तालुक्याच्या भौगोलिक हद्दीचा आणि कार्यालयाच्या प्रत्यक्ष अंतराचा विचार न करता कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आल्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

साध्या कामासाठीही हेलपाटे

वाहनधारकांना कागदपत्रांची पूर्तता, तपासणी अथवा अन्य प्रशासकीय प्रक्रियांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. वैजापूरपर्यंतचा प्रवास करून काम पूर्ण करण्याची वेळ आल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. एकीकडे शासनाकडून प्रशासकीय सेवा नागरिकांच्या जवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे आरटीओ कार्यालयाच्या दारात असलेल्या वाहनधारकांना दूरच्या कार्यालयात जावे लागत आहे.

Chhatrapati Sambhajinagar RTO Office
Vidya Balan: विद्या बालन दिसणार मराठी सिनेमात? व्हीडियोतून दिली हिंट

कार्यक्षेत्राच्या फेररचनेची मागणी

वाळूज औद्योगिक पट्ट्याचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता परिवहन विभागाने या परिसरातील कार्यक्षेत्राचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. गावांचे भौगोलिक स्थान, नागरिकांना पडणारे अंतर आणि प्रशासकीय सोय यांचा विचार करून वडगाव कोल्हाटी, तिसगाव, बजाजनगर, राजापूर, करोडी आणि सिडको वाळूज महानगर या गावांचा समावेश करोडी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करावा अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news