Jalna Health News : आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे

वैद्यकीय अधिकारी पद रिक्त; केंद्रात रुग्णांना उपचार मिळेना
Jalna Health News
आष्टी : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी नसल्याने खुर्ची रिकामी दिसून येत आहे. (छाया: हरुण कच्छी)
Published on: 
Updated on: 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात डेंग्यूच्या आजाराची भीती वाढत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार विस्कळीत झाला आहे.

गावात डेंग्यूची साथ पसरण्याची भीती असतानाही डास अळी सर्वेक्षण केले जात नसल्याची तक्रार आहे. तसेच गर्भवती मातांच्या नियमित तपासण्या बंद असल्याने ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

Jalna Health News
Diabetes Diet During Diwali: दिवाळीत मधुमेहींनी काय खावे आणि काय टाळावे? डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

परिणामी रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांपासून विविध देयके थकीत असल्याची माहिती समोर येत असून, याचा आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

शासनामार्फतची हिंद लॅब पॅथॉलॉजी सेवा बंद; रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधारे पैसे खर्च करावा लागतो. सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाची ठरणारी महाराष्ट्रातील हिंद लॅब मोफत पॅथॉलॉजी सेवा बंद झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य केंद्रात आवश्यक रक्त व इतर वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध न झाल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळांकडे धाव घ्यावी लागत आहे.

Jalna Health News
Rohit Pathare Case : तुम्हाला मेलेल्या माणसाला अटक करायची होती का ?

दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि मजूर कुटुंबांना आता वैद्यकीय तपासण्यांसाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ येत आहे. शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्याऐवजी रुग्णांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असताना डास अळी सर्वेक्षण, जनजागृती, परिसराची पाहणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

तालुका अधिकारी यांचा बोलण्यास नकार

आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, रिक्त पदे, डास अळी सर्वेक्षण, गर्भवती मातांच्या तपासण्या, मोफत पॅथॉलॉजी सेवा बंद आणि दोन वर्षांपासून थकीत असलेल्या देयकांसंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम राठोड यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या सर्व बाबींवर विचारणा केली असता, 'मी या सर्व बाबींवर काही सांगू शकत नाही,' असे उत्तर देत त्यांनी फोन कट केला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या प्रश्नांवर स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.